नागपूर-अमरावती महामार्गावर दोन कंटेनर समोरासमोर धडकले; एक जागीच ठार, दोन गंभीर; टायर फुटल्याने भीषण अपघात

नागपूरहून अमरावतीकडे कंटेनर जात होता, नांदगाव पेठजवळ वेगात असणारा कंटेनर आला असता कंटेनरचा टायर अचानक फुटला. कंटेनर वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनर डिवायडरवर चढून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कंटेनरला समोरासमोर धडक दिली.

नागपूर-अमरावती महामार्गावर दोन कंटेनर समोरासमोर धडकले; एक जागीच ठार, दोन गंभीर; टायर फुटल्याने भीषण अपघात
नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात, एक ठारImage Credit source: tv 9 marathi
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 2:39 PM

अमरावतीः नागपूर-अमरावती महामार्गावर (Nagpur-Amravati Highway ) नांदगाव पेठ जवळ कंटेनरचा टायर फुटल्याने (container accident) डिवायडर ओलांडून पलिकडील कंटेनरला जोरदार धडक बसल्याने एक जण जागीच ठार (One Death) झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही कंटेनरचे नुकसान झाले असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.दुपारी अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

 कंटेनरचा टायर फुटला

नागपूरहून अमरावतीकडे कंटेनर जात होता, नांदगाव पेठजवळ वेगात असणारा कंटेनर आला असता कंटेनरचा टायर अचानक फुटला. कंटेनर वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून कंटेनर डिवायडरवर चढून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कंटेनरला समोरासमोर धडक दिली.

चालकाच्या केबिनचा चक्काचूर

ही धडक इकती जबरदस्त होती की, समोरासमोर धडक बसल्याने दुसऱ्या कंटेनरची चालकाच्या केबिनचा चक्काचूर झाला. या अपघातात दोन कंटेनरची एकमेकांना जोरदार धडक बसल्याने दोन्ही कंटेनरमधील चालक क्लिनर जखमी झाले आहेत, तर एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महामार्गावर वाहतूक कोंडी

अवजड साहित्य घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अचानक टायर फुटल्याने हा अपघात झाल्याचे कंटेनर चालक सांगत आहे, मात्र कंटेनरची वेगात असल्याने डिवायडर तोडून दुसऱ्या बाजूला गेला आहे. या अपघातानंतर नागपूर-अमरावती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. समोरा-समोर वाहनांची धडक झाल्याने महामार्गावर या अपघाताचा जोरदार आवाज झाला होता, त्यामुळे परिसरातील लोकांनी महामार्गावर प्रचंड गर्दी केली होती. या घटनेची नोंद नांदगाव पोलिसात झाली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.