हनुमान चालिसा, कोठडी, हॉस्पिटल सगळ्या घडामोडींनंतर 36 दिवसांनी राणा दाम्पत्य अमरावतीत परतणार, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
अमरावतीत परतताच राणा दाम्पत्य पुन्हा एकदा अॅक्टिव्ह होणार असल्याचं दिसतंय. हे दोघे पुन्हा एकदा हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून सक्रीय होण्याची चिन्ह आहेत.अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि महाआरती हे दोघे करणार आहेत.
अमरावती : हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य पहिल्यांदाच अमरावतीत येणार आहे. या सगळ्या प्रकरणानंतर 36 दिवसांनी हे दोघे अमरावतीत जाणार आहेत. 28 मेला नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा (Ravi Rana) अमरावती जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागताची तयारी करण्यात येत आहे. अमरावतीत परतताच राणा दाम्पत्य पुन्हा एकदा अॅक्टिव्ह होणार असल्याचं दिसतंय. हे दोघे पुन्हा एकदा हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून सक्रीय होण्याची चिन्ह आहेत.अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि महाआरती हे दोघे करणार आहेत. तसंच ते विदर्भात एक लाख हनुमान चालीसा पुस्तकांचं वाटप करणार असल्याची माहिती आहे.
36 दिवसांनी अमरावतीत परतणार
हनुमान चालिसा प्रकरणानंतर राणा दाम्पत्य पहिल्यांदाच अमरावतीत येणार आहे. या सगळ्या प्रकरणानंतर 36 दिवसांनी हे दोघे अमरावतीत जाणार आहेत. 28 मेला नवनीत राणा आणि रवी राणा अमरावती जिल्ह्यात येणार आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण
राणा दाम्पत्य या सगळ्या घडामोडींनतर पहिल्यांदाच अमरावतीत परतणार आहेत. त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागताची तयारी करण्यात येत आहे.
हनुमान चालिसा पठण करणार
अमरावतीत परतताच राणा दाम्पत्य पुन्हा एकदा अॅक्टिव्ह होणार असल्याचं दिसतंय. हे दोघे पुन्हा एकदा हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरून सक्रीय होण्याची चिन्ह आहेत.अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठण आणि महाआरती हे दोघे करणार आहेत.
हनुमान चालिसा पुस्तिका वाटणार
हनुमान चालिसा प्रकरणामुळे राणा दाम्पत्य चर्चेत आलं. त्यासाठी त्यांना थेट तुरुंगाची हवा खावी लागली. पण राणा दाम्पत्य त्यांच्या हनुमान चालिसेच्या मुद्द्यावर ठाम असल्याचं दिसतंय. नवनीत आणि रवी राणा विदर्भात एक लाख हनुमान चालीसा पुस्तकांचं वाटप करणार असल्याची माहिती आहे.
राणा दाम्पत्य आणि हनुमान चालिसा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणणार असल्याचं राणा दाम्पत्याने जाहीर केलं. त्यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मान दुखीचा त्रास होत असल्याने नवनीत राणा यांना लीलावती रूणालयात दाखल करण्यात आलं. या सगळ्या प्रकरणानंतर त्यांना आता हे दोघेही पहिल्यांदाच अमरावतीत येणार आहेत. त्यामुळे कार्यक्त्यांमध्ये उत्साह आहे.