Navneet Rana : हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, सत्तेचा दुरोपयोग थांबवा, पडळकरांना अडवल्यावरून नवनीत राणा संतापल्या

हे सरकार सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर करत आहे. अशी टीका वारंवर होत आहे. आता आज घडलेल्या राजकीय ड्राम्यावरून आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

Navneet Rana : हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, सत्तेचा दुरोपयोग थांबवा, पडळकरांना अडवल्यावरून नवनीत राणा संतापल्या
हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारं नाही, सत्तेचा दुरोपयोग थांबवा, पडळकरांना अडवल्यावरून नवनीत राणा संतापल्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 10:19 PM

अमरावती : आज राज्यभर अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar Jayanti) यांची जयंती राज्यभर थाटामाटात साजरी झाली. मात्र चौंडीत जो प्रकार घडला त्यावरून अजूनही जोरदार टीका होत आहे. भाजप आणि इतर विरोधक यावरून आता सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना चौडीत जाताना पोलिसांनी अडवलं. त्यांच्याबरोबर सदाभाऊ खोतही होते. या दोघांना पोलिसांनी अडवल्यानंतर दोघांनीही सरकारवर टीकेची झोड उडवली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राष्ट्रवादीने जयंतीचा कार्यक्रम हा हायजॅक केला म्हणत रोहित पवार यांच्यावर हल्लाबोल चढवला. हे सरकार सत्तेचा आणि पोलिसांचा गैरवापर करत आहे. अशी टीका वारंवर होत आहे. आता आज घडलेल्या राजकीय ड्राम्यावरून आता नवनीत राणा (Navneet Rana) यांनी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल चढवला आहे.

काय म्हणाल्या नवनीत राणा?

जे राजकीय वेगवेगळ्या दृष्टीचे लोक आहे त्यांनी आपली पावर ठेवली पाहिजे मात्र कोणी आपल्या पावरचा दुरुपयोग करू नये, गेल्या अडीच वर्षांपासून हेच सुरू आहे. अशा कार्यक्रमात जाण्यापासून कोणाला अडवणे हे काही चांगलं नाही आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. आज पावर इथे आहेत, उद्या सत्तेच्या बाहेरही जाणार आहेत.  त्याचा विचार करून पाऊलं टाकली पाहिजेत, असा इशाराही नवनीत राणा यांनी दिला आहे.

पडळकरांना रोखणं निंदनीय

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीला गेलेल्या गोपीचंद पडळकरांना रोखणं चुकीचं आहे, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक करण्याचा प्रयत्न केलाय, तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्यामार्गावर चालणाऱ्या पडळकर याना अडवलं हे निंदनीय आहे, अशा तीव्र शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार आणि रोहित पवारांवर हल्लाबोल चढवला आहे. त्यामुळे हा वाद आता दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

हे सुद्धा वाचा

हा कार्यक्रम देशातील जनतेचा

तर या प्रकाराबाबत आमदार रोहित पवार यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. या गोष्टीचं कोणी राजकारन करू नये. हा कार्यक्रम देशातील सर्व जनतेचा आहे. त्यामुळे आज मला राजकीय काही बोलायचे नाही. हा कार्यक्रम झाल्यावर माझ्यावर आरोप करणाऱ्यांना उत्तर देईल.  आम्ही सगळ्यांना एकत्रित घेऊन काम करत आहोत. तुम्ही पाहू शकता लोक मोठ्या प्रमाणात येत आहेत, असे म्हणत राम शिंदेच्या आरोपांना आणि गोपीचंद पडळकरांच्या आरोपांना रोहित पवार यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.