Navneet Rana : हत्या करणारा आणि हे प्रकरण दाबणाराही गुन्हेगारच; उमेश कोल्हेंच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणांचा संताप

मागील 12 वर्षांपासून मी अमरावतीत राहते. अमरावती माझे सासर आहे. मात्र अशाप्रकारची घटना मी कधी पाहिली नाही, असा संताप नवनीत राणा यांनी व्यक्त केला आहे.

Navneet Rana : हत्या करणारा आणि हे प्रकरण दाबणाराही गुन्हेगारच; उमेश कोल्हेंच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणांचा संताप
उमेश कोल्हेंच्या कुटुंबीयांची नवनीत राणांनी घेतली भेटImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 9:54 PM

अमरावती : अमरावतीत उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करणारा गुन्हेगार आहेच मात्र त्यासोबतच ही घटना दाबण्याचा प्रयत्न करणारेही गुन्हेगार आहेत, असे वक्तव्य खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केले आहे. त्या अमरावतीत बोलत होत्या. मेडिकल स्टोअर्स चालवणाऱ्या उमेश कोल्हे यांची 21 जून रोजी हत्या करण्यात आली. भाजपाच्या वादग्रस्त नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ कोल्हेंनी पोस्ट लिहिली होती. त्यानंतर त्यांचा खून करण्यात आला. त्यातील आरोपींना अटकही करण्यात आली आहे. एकूण सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी नवनीत राणा यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची आज भेट घेतली. त्यावेळी त्यांनी माजी पालकमंत्री यांच्यासह सीपींवरही प्रकरण दाबल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

‘पोलीस आयुक्तांचे हे अपयश’

मागील 12 वर्षांपासून मी अमरावतीत राहते. अमरावती माझे सासर आहे. मात्र अशाप्रकारची घटना मी कधी पाहिली नाही. अमरावती शांत शहर होते. सर्वजण एकतेत राहत होते. हे पोलीस आयुक्तांचे अपयश आहे. आधी याठिकाणी दंगली झाल्या, लोकांवर दगडफेक करण्यात आली, त्यावेळीदेखील येथे कायदा-सुव्यवस्था निर्माण झाली होती. त्यावेळीदेखील त्यांचे अपयश होते, असा आरोप त्यांनी पोलीस आयुक्तांवर केला आहे. आणखी काही जणांना वेगवेगळ्या नंबरवरून धमक्या येत आहेत. आम्ही अमरावती सोडून जातो, असे धमक्या मिळालेल्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी विचार करण्याची गरज आहे, असे त्या म्हणाल्या.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाल्या नवनीत राणा?

काय होती घटना?

उमेश कोल्हे (54) यांचे मेडिकल स्टोअर्स आहे. 21 जून 2022ला कोल्हे रात्री उशिरा आपल्या मेडिकलमधून घरी जात असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला. घरी परतत असताना या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठले आणि त्यांच्यावर चाकूने सपासप वार करत त्यांची हत्या केली. वादग्रस्त भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.