नवीन अमरावतीचा रेल्वे स्थानक पिंक स्टेशन, पिंक स्थानक म्हणजे नेमकं काय?

नवीन अमरावती रेल्वेस्थानकावर १२ सक्षम महिला कर्मचारी आहेत. यापैकी ४ महिला या उपस्टेशन अधीक्षक, ४ पॉईंट वुमन, ३ रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि एक स्टेशन तिकीट बुकिंग एजंट आहे.

नवीन अमरावतीचा रेल्वे स्थानक पिंक स्टेशन, पिंक स्थानक म्हणजे नेमकं काय?
Follow us
| Updated on: Aug 13, 2023 | 6:37 PM

अमरावती : महिला कर्मचाऱ्यांना (Female employees) समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वे नेहमी अग्रेसर असते. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने मध्य रेल्वेने एक पाऊल पुढे टाकले आहे. मध्य रेल्वेचा तिसरा पिंक स्टेशन (Pink Station) म्हणून नवीन अमरावती रेल्वेस्टेशन (Railway Station) झाला आहे. भुसावळचा रेल्वेस्थानक हा पहिला पिंक रेल्वेस्टेशन आहे. पिंक रेल्वेस्टेशन याचा अर्थ रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापन महिला कर्मचाऱ्यांकडून केले जाते. नवीन अमरावती रेल्वेस्थानकावर १२ सक्षम महिला कर्मचारी आहेत. यापैकी ४ महिला या उपस्टेशन अधीक्षक, ४ पॉईंट वुमन, ३ रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि एक स्टेशन तिकीट बुकिंग एजंट आहेत.

१२ सक्षम महिला कर्मचारी चालवतात कारभार

नवीन अमरातवी रेल्वे स्टेशनवरून दररोज दहा ट्रेनमधून ३८० पॅसेंजर ये-जा करतात. मध्य रेल्वे महिलांना रेल्वेस्थानक चालवण्यासाठी संधी देते. त्यातून महिलांचे नेतृत्व पुढे येते. १२ महत्त्वाच्या पदांवर सर्व महिला कर्मचारी काम करतात. यामुळे नवीन अमरावती रेल्वेस्थानकाला पिंक रेल्वे स्थानकाचा दर्जा मिळाला.

माटुंगा हे पहिले पिंक स्टेशन

माटुंगा हे मुंबई डिव्हीजनधील पहिले पिंक रेल्वेस्टेशन होते. तर नागपूर डिव्हीजनमधील अजनी हे पहिले पिंक रेल्वेस्टेशन होते. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ही देशातील पहिली रेल्वेलाईन १६ एप्रिल १८५३ साली सुरू झाली. तेव्हापासून देशात रेल्वेचे जाळे विणले गेले.

राज्यातील ४४ रेल्वेस्थानकांचा विकास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकताच अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यातील ५०८ रेल्वेस्थानकांच्या पायाभरणीचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेसाठी २४ हजार ४७० कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे. महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा विकास होणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ उपनगरीय रेल्वेस्थानकांचा समावेश आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.