Amravati Police | लग्नाचा वाढदिवस नव्हे पश्चाताप दिन! सुटी हवी असल्याचा पोलीस कर्मचाऱ्याचा अर्ज
अमरावतीत एक अजब गजब प्रकार घडला आहे. या प्रकाराची चर्चा संपूर्ण पोलीस दलात आता रंगू लागली आहे. पोलीस अमलदाराने चक्क पश्चाताप दिनानिमित्त एक दिवसाची सुटी हवी असल्याचा अर्ज ठाणेदारकडे केला आहे. पोलीस दलातील या विशेष विनंती अर्जाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
अमरावती : जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनला (Mangrul Dastagir Police Station) हा पोलीस कर्मचारी कार्यरत आहे. विनोद राठोड (Vinod Rathod) असं या पोलीस अमलदाराचं नाव. 29 मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे 27 मार्चची साप्ताहिक रजा 29 मार्चला बदली करून द्यावी, अशी विनंती केली आहे. विशेष म्हणजे सुट्टीसाठी हव्या असलेल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या कारणासमोर (Reasons for Wedding anniverssary) कंसात पश्चाताप दिन असा उल्लेख केला. अर्जाची ही प्रत सर्वत्र व्हायरल होतंय. पोलीस दलासह सर्वत्र या विनंती अर्जाची चर्चा होत आहे.
सुटीचे कारण पश्चाताप दिन
सरकारी नोकरीत असलेलं कर्मचारी हे आपल्या विविध कामासाठी वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सुटीचा अर्ज करतात. सुटी नेमकी कशासाठी हवी आहे हे देखील ते आपल्या अर्जात नमूद करत असतात. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील मंगरुळ दस्तगीर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत एका पोलीस अंमलदाराने सुटीसाठी वरिष्ठाकडे केलेला अर्ज मात्र चर्चेचा विषय ठरू लागला आहे. कारण वार्षिक कॅलेंडरमध्ये नसलेला दिन साजरा करण्यासाठी या पोलीस अंमलदाराने रजा मागितली आहे. लग्नाचा वाढदिवसाला या पोलीस अमलदाराने चक्क पश्चाताप दिवस म्हणून नामकरण केले आहे. आणि तो दिवस साजरा करण्यासाठी या पोलिसाने अर्ज केला आहे. हा अर्ज पाहून पोलीस अधिकारी ही चक्रावून गेले होते.
वाचा पत्रात नेमकं काय लिहिलंय
अमरावती जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाच्या वाढदिवसासाठी नव्हे, तर पश्चाताप दिनासाठी सुटी मागितली तो अर्ज. pic.twitter.com/L9jkG3wYPF
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 30, 2022
28 तारखेला केला होता अर्ज
अमरावती जिल्ह्यातील मंगळुर दस्तगीर पोलीस ठाण्यात कार्यरत विनोद राठोड या पोलीस अमलदाराने 29 मार्च रोजी लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे 27 मार्चची साप्ताहिक रजा 29 मार्चला बदली करून द्यावी अशी विनंती केली आहे.