महिलेसोबत तलाठी कार्यालयातच अश्लील चाळे, तलाठ्याने मित्रांनाही बोलावले, गावकऱ्यांनी दिला चोप
अमरावती : जिल्ह्यातल्या पिंपळगाव बैनाई येथे एक वेगळाच प्रकार घडला. बहुतेक वेळा तलाठी कार्यालयात शेतकरी कामानिमित्त येतात. मात्र, तलाठी आणि त्याच्या काही मित्रांनी एक महिलेला तलाठी कार्यालयात बोलावले. त्याच ठिकाणी त्यांनी अश्लील चाळे सुरू केले. माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्यानं व त्याच्या काही मित्रानी […]
अमरावती : जिल्ह्यातल्या पिंपळगाव बैनाई येथे एक वेगळाच प्रकार घडला. बहुतेक वेळा तलाठी कार्यालयात शेतकरी कामानिमित्त येतात. मात्र, तलाठी आणि त्याच्या काही मित्रांनी एक महिलेला तलाठी कार्यालयात बोलावले. त्याच ठिकाणी त्यांनी अश्लील चाळे सुरू केले. माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला.
अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्यानं व त्याच्या काही मित्रानी हा प्रताप केलाय. तलाठी कार्यलयात एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक घटना घडली. हा प्रकार गावकऱ्यांनी या तलाठ्याला व महिलेला रंगेहाथ पकडून समोर आणला आहे. त्यामुळं तलाठी कार्यालय नागरिकांच्या कामांसाठी आहे की अश्लील चाळे करण्याचा अड्डा आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गावकऱ्यांनी तलाठ्यासह त्याच्या मित्रांना झोडपले
पिंपळगाव बैणाई येथील तलाठी कार्यालयातील व्ही भगत या तलाठ्यानं बुधवारी तलाठी कार्यालयात एका महिलेला आणले. सोबतच त्याच्या पाच मित्रांना बोलावून कार्यालयात दारू पिऊन अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तलाठी कार्यालयात अश्लील चाळे सुरू असल्याची कुजबूज गावातील नागरिकांना लागली. पाच ते सहा नागरिकांनी तलाठी कार्यालय गाठले. या कार्यालयात सुरू असलेला प्रकार पाहून नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली. यामध्ये गावकऱ्यांनी तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्याला चांगलाच चोपही दिला. यामध्ये तीन मित्र हे पसार झाले आहेत. दरम्यान, तलाठी कार्यालयात असा प्रकार नेहमीच होत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणंय. या प्रकरणी नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली आहे.
मनोरुग्णालयातील सुरक्षा रक्षकांची हकालपट्टी
नागपुरातल्या प्रादेशिक मनोरुग्णालयात सुरक्षा रक्षकांसोबत कर्मचार्यांची दारू पार्टी रंगल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यामुळे मनोरुग्णालयाची प्रतिमा मलिन झाली. याची दखल घेत मनोरुग्णालय प्रशासाने सुरक्षा रक्षकाला कामावरून काढून टाकले आहे. सोमवारला मनोरुग्णालयात दारू पार्टी रंगल्याची बाब प्रशासनाच्या नजरेत येताच नागपूर सुरक्षा रक्षक मंडळामार्फत तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाला कामावरून काढण्यात आले. तसेच मंडळाला मनोरुग्णालयात व्यसनी व्यक्तीची नियुक्ती करू नका, असे पत्रातून कळविण्यात आले असल्याची माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पुरुषोत्तम मडावी यांनी दिली. या दारू पार्टीत एक मनोरुग्णालयाचा कर्मचारी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मनोरुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. श्रीकांत कोरडे तसेच प्रशासकीय अधिकारी बांगडे यांचा समावेश असलेली समिती गठीत केली.