…तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री सोडा, विरोधी पक्षनेतेपदही जाईल; या नेत्यानं राष्ट्रवादीला निकालात काढलं
राष्ट्रवादीकडून भावी मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात येत असली तरी याआधी राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी थांबून अजित पवार आणि जयंत पाटील यांची झालेली विभागणीही थांबणे गरजेची आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
अमरावती : राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुका होत असल्यामुळे राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. कुठे महाविकास आघाडी, तर कुठे युतीच्या जागांवर बाजार समितीच्या जागा, तर कुठे भाजप सोबत महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे या बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये एकाच पक्षाला विजयी ठरवणे म्हणजे हे मूर्खपणाचं लक्षण आहे असा टोला त्यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवर प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
आमदार बच्चू कडू यांनी या निवडणुकांवर बोलताना त्यांनी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्री यावरून चाललेल्या चर्चेवरूनही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार जयंत पाटील यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यावरूनही राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते.
त्यावर मत व्यक्त करताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भावी मुख्यमंत्र्यांची चर्चा होत असली तरी आधी त्यांच्यातील गटबाजी थांबवणे गरजेची आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही चर्चा होत असली तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा एक गट तर दुसरीकडे आमदार जयंत पाटील यांचा एक गट आहे.
त्यामुळे ही गटबाजी आधी थांबवणे ही राष्ट्रवादीसाठी काळाची गरज आहे. कारण भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरबाजी राज्यभरात आली असली तर या पक्षातील गटबाजी आधी थांबवणे त्यांच्यासाठी महत्वाची आहे.
एकीकडे ही भावी मुख्यमंत्री पदाच्या शर्यत चालू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पक्षातील गटबाजी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यामुळे अशा राजकारणामुळे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री पद सोडा, विरोधी पक्षनेतेपदही जाईल असा टोलाही बच्चू कडू याी लगावला आहे.
राष्ट्रवादीकडून भावी मुख्यमंत्री पदाची स्वप्नं पाहण्यात येत असली तरी याआधी राष्ट्रवादी पक्षातील गटबाजी थांबून अजित पवार आणि जयंत पाटील यांची झालेली विभागणीही थांबणे गरजेची आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.
आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री पद सोडा विरोधी पक्षनेते पदही राष्ट्रवादीचे निघून जाईल असा खोचक टोला लगावल्यामुळे प्रहार आणि राष्ट्रवादीचे जोरदार युद्ध रंगणार असल्याची चिन्हं दिसून येत आहे.