अर्थसंकल्पातील या नेत्यानं कळीचा मुद्दा सांगितला; “मैं हिंदुस्तानी हूं तो…”, अर्थसंकल्पही….
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला असला तरी त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणताही मुद्दा मांडण्यात आला नाही. कोरडवाहू शेतीसाठी, बागायतदार शेतकऱ्यांसाठी सरकारने फायदेशीर अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
अमरावतीः मैं हिंदुस्तानी हूं त्यामुळे आमच्या देशाचा अर्थसंकल्प हा हिंदीतूनच सादर झाला पाहिजे असं मत प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केले. बच्चू कडू यांनी हिंदीतून अर्थसंकल्प सादर झाला पाहिजे तरच तो देशातील तळागाळापर्यंत पोहचेल असं मतही त्यांनी व्यक्त केले. आपल्या देशात बहुसंख्य हे हिंदी भाषिक असल्यामुळे आणि जनसामान्य लोकांना हिंदी भाषा समजत असल्यामुळे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा हिंदीतूनच सादर झाला पाहिजे असं स्पष्ट मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आपल्या देशाचा बहुभाषिक हा हिंदी भाषा बोलणारा असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहिणार असल्याचेही आमदार बच्चू कडू यांनी सांगितले.
अर्थसंकल्पाकडून लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत यावर बोलताना बच्चू कडू यांनी सांगितले की, अर्थसंकल्प हा राज्याचा असो किंवा देशाचा असो त्या अर्थसंकल्पावर चहूबाजूंनी विचार करण्याची गरज आहे. अर्थसंकल्पामध्ये गोरगरीबांसाठी ज्या योजना सादर केल्या जातात.
त्या योजना ग्रामीण आमि शहरी न राहता त्यांचा कुठेतरी समानपातळीवर विचार व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. गरीब जनतेसाठी ज्या गृह प्रकल्प योजना राज्य आणि केंद्र सरकारतर्फे राबवल्या जातात त्या योजनांबाबत त्या घरांचे निकष बदलण्याची गरज आहे.
कारण या योजनांमधील घरांबाबत शहर आणि ग्रामीण यामध्ये तफावत आहेत. तो भरून काढणारा अर्थसकल्प पाहिजे होता असंही त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले.
केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाला असला तरी त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणताही मुद्दा मांडण्यात आला नाही. कोरडवाहू शेतीसाठी, बागायतदार शेतकऱ्यांसाठी सरकारने फायदेशीर अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
अर्थमंत्र्यानी अर्थसंकल्प इंग्रजीतून मांडला त्यावर बोलताना ते म्हणाले की आपल्य भारतातून ब्रिटीश गेले असले तरी त्यांनी आपली भाषा इथे सोडून गेले आहेत.
त्यामुळे आपल्या भारतात हिंदी भाषा बोलली जाते,त्यामुळे अर्थसंकल्प हा हिंदीतूनच सादर झाला पाहिजे, आणि त्यासाठी अर्थमंत्र्यानी माफीही मागितली पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.