अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये एका युवतीचं अपहरण झाल्याचा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी केला. नवनीत राणा यांनी अमरावती शहरातील राजपेठ पोलीस (Rajpeth Police) ठाण्यात पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा केला. पोलिसांना अपमानास्पद वागणूक खासदार नवनीत राणा यांनी दिली. तसेच त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. त्यामुळे आज राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या ( Police Boys Association) वतीने नवनीत राणा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी नवनीत राणा यांचा निषेध करण्यासाठी पोलीस कुटुंबीय (police family) मोठ्या प्रमाणावर रस्तावर उतरले होते. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. वारंवार पोलिसांबद्दल अपमानास्पद बोलणे हे त्यांनी टाळावं. त्यांनी तात्काळ पोलिसांची माफी मागावी, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉइज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
अमरावतीत आंतरजातीय विवाहाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या प्रकरणी काल अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी लव्ह जिहादचा आरोप करत पोलिसांवर संताप व्यक्त केला होता.मुलीचे अपहरण केलं, असा आरोप देखील करण्यात आला होता. अखेर रात्री दहा वाजता मुलगी सातारा रेल्वे पोलिसांना मिळाली आहे.सदर मुलगी रेल्वेने एकटीच प्रवास करत होती. पुणे व सातारा पोलिसांची यात मदत घेतली, अशी माहिती अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी दिली. भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी पोलीस आयुक्त आरती सिंग यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. राजापेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी नवनीत राणा यांनी पोलिसांसोबत हुज्जत घालून राडा घातला होता.