Raj Thackeray : राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, सेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हाला मिर्ची का लागली, रवी राणांचा सवाल
राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, तुम्ही किती भूमिका बदलल्या हे आधी बघा असे म्हणत रवी राणा यानी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच संजय राऊत आणि नवनीत राणा, रवी राणा, लडाखमध्ये भेटले होतो, त्यावरूनही राज ठाकरेंनी शिवसेनेचा समाचार घेतला होता, त्यालाही रवी राणा यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अमरावती : आजच राज ठाकरेंची (Raj Thackeray) पुण्यात तुफानी सभा पार पडलीय. या सभेत राज ठाकरेंनी विविध मद्द्यांवर भाष्य करत अनेकांना टार्गेट केलं. यावेळीही त्यांनी हिंदुत्वावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांना टार्गेट केलेच मात्र मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणाचा हट्ट धरणाऱ्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि रवी राणा यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. मातोश्री हे काय हनुमान चालीसा म्हणायला मशीद आहे का? असा सवाल त्यांनी राणा दाम्पला केला. त्यानंतर आता आमदार रवी राणा यांच्याकडून राज ठाकरेंवर पलटवार करण्यात आलाय. राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, तुम्ही किती भूमिका बदलल्या हे आधी बघा असे म्हणत रवी राणा यानी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. तसेच संजय राऊत आणि नवनीत राणा, रवी राणा, लडाखमध्ये भेटले होतो, त्यावरूनही राज ठाकरेंनी शिवसेनेचा समाचार घेतला होता, त्यालाही रवी राणा यांनी आता जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले रवी राणा?
राज ठाकरे यांच्यावर पलटवार करताना रवी राणा म्हणाले, राजद्रोहाच्या खोट्या गुन्हा मध्ये एका महिला खासदाराला मला जेल मध्ये टाकते यावर राज ठाकरे एक शब्द बोलत नाहीत. तुम्ही औरंगाबाद मध्ये एवढी सभा घेतली भडकावू भाषण केले तेव्हा तुमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होत नाही, कारण तुमची मॅच फिक्सिंग असते, तसेच संजय राऊत यांच्याशी चर्चा केल्याने तुम्हाला मिर्ची लागण्याचे कारण नाही, तुम्ही केलं ते सत्य आम्ही केलं ते असत्य असे आहे का? टीका करताना आधी विचार करा तुम्ही किती यूटर्न आपण घेतले, असा टोला राणा यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
तुम्हाला मिर्ची लागण्याचे कारण नाही
तसचे मातोश्री ही मशीद नाही हे आम्हाला माहिती आहे पण मातोश्री हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. तिथं हनुमान चालीसा वाचायचा प्रयत्न केला म्हणून तो राजद्रोह होऊ शकत नाही, तर महाराष्ट्राबाहेर एखादा नेता भेटल्यावर त्यांच्यासोबत बोलणे हा गुन्हा नाही, त्यानंतर राज ठाकरे तुम्हाला मिरची लागायचे कारण नाही, असा टीका राणा यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. नवनीत राणा, रवी राणा आणि संजय राऊत यांची लडाखमधील भेट ही चांगलीच गाजली आहे. हा संसदीय दौरा होता एवढेही या लोकांना कळत नसेल तर यांच्यावर उपचार झाले पाहिजेत अशी टीका यावरून संजय राऊतांनी केली आहे.