संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, अमरावतीचे राजापूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर

शिवप्रतिष्ठान स्वराज्य संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात आता पोलिसांकडून प्रत्यक्षपणे कारवाईला सुरुवात होणार असल्याची माहिती मिळत आहे.

संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी मोठी बातमी, अमरावतीचे राजापूर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर
Follow us
| Updated on: Jul 31, 2023 | 6:44 PM

अमरावती | 31 जुलै 2023 : शिवप्रतिष्ठान स्वराज्य संस्थेचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. याचप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. राजापेठ पोलीस आता या प्रकरणी पुढील कारवाईला सुरुवात करणार आहेत. राजापेठ पोलीस संभाजी भिडे यांना नोटीस पाठवणार आहेत. त्यामुळे संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजापेठ पोलीस संभाजी भिडे यांना कायदेशीर नोटीस बजावणार आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सीआरपीसी कलमनुसार संभाजी भिडे यांना पोलीस नोटीस देणार आहेत. भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ऑडिओ क्लिप पोलीस तपासणार आहेत. वादग्रस्त ऑडिओ क्लिप संभाजी भिडे यांच्याच आवाजाची आहे का? यासाठी भिडे यांच्या खऱ्या आवाजाचे सॅम्पल घेऊन फोरेन्सिक तपासणी करणार आहे.

सभाजी भिडे यांच्याविरोधात ठाण्यातही गुन्हा दाखल

संभाजी भिडे यांच्या अडचणी वाढवणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या तक्रारीनंतर नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. तसेच संभाजी भिडे यांना अटक केली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करु, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिलाय.

ठाण्यातला गुन्हा राजापूर पोलिसांकडे वर्ग

“भारतीय दंड संहितेच्या 153 अ, 500 आणि 505 (2) यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा राजापूर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. त्याचा तपास अमरावतीच्या राजापूर पोलीस करणार आहेत”, असं ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी स्पष्ट केलं.

संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला औरंगाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली

दरम्यान, औरंगाबादमधूनही मोठी बातमी समोर आली आहे. संभाजी भिडेंच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली आहे. औरंगाबाद पोलिसांनी संभाजी भिंडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. संभाजी भिडे यांचा कार्यक्रम औरंगाबाद येथील अग्रसेन भवन येथे होणार होता. शहरातील संवेदनशील वातावरणाचे कारण देत पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.

दरम्यान, संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहेत. राज्यभरातील विविध पक्षांच्या नेत्यांकडून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर निषेध व्यक्त केला जातोय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील संभाजी भिडे यांच्याविरोधात योग्य कारवाई केली जाईल, असं म्हटलं आहे.

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.