राणा दाम्पत्य होळीचे पाच दिवस आदिवासींसोबत घालवणार; मेळघाटमध्ये वेळ घालवण्याचे कारण काय?

त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राणा दाम्पत्य गेल्या १२ वर्षांपासून होळी ही आदिवासी भागात घालवतात. आदिवासींसोबत नृत्य करतात. त्यांच्या जीवनाशी समरस होतात. त्यांच्या जीवनातील सुख-दुःख समजून घेतात.

राणा दाम्पत्य होळीचे पाच दिवस आदिवासींसोबत घालवणार; मेळघाटमध्ये वेळ घालवण्याचे कारण काय?
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 8:59 AM

अमरावती : होली के रंग-मेलघाट के आदिवासीयो के संग. आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांचा 5 दिवसीय मेळघाट होळी दौरा प्रारंभ झाला. 5 दिवस राणा दाम्पत्य मेळघाटातील अतिदुर्गम गावात मुक्कामी राहणार आहे. खासदार नवनीत रवी राणा यांच्या प्रयत्नांनी आदिवासींचे रोजगार हमी योजनेचे रखडलेले पैसे तात्काळ मिळणार आहेत. ऐन होळीच्या तोंडावर पैसे रखडल्याने आदिवासी चिंतीत होते. खासदार नवनीत रवी राणा यांनी तात्काळ जिल्हाधिकारी श्रीमती पवणीत कौर यांच्यासोबत संपर्क साधून यावर तोडगा काढण्याचे सुचविले. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे वचन दिले. आता आदिवासींना तातडीने मजुरीचे पैसे मिळणार आहेत. त्यांची होळी आनंदात जाणार आहे.

स्वाभीमानींच्या शिलेदारांसोबत दाखल

परंपरा, संस्कृती जोपासून गेल्या 12 वर्षांपासून आपली होळी आदिवासी बंधू-भगिनीसोबत साजरी करणारे आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांचा मेळघाट होलीमिलन स्नेहमिलन दौरा प्रारंभ झाला आहे. आपल्या स्वाभिमानी शिलेदारासह आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा हे धारणी तालुक्यात दाखल झाले आहेत. हैद्रामल, चीचाटी, कालापाणी, सोलामू, बदनापूर, रामटेक, मलकापूर, वस्तपूर, सोमखेडा, माजरी आदी गावांमध्ये जातील. गावागावात आदिवासींना होळीच्या शुभेच्छा दिल्या. आदिवासी युवकांना व्हॉलिबाल किट, कॅलेंडर आदींचे वाटप केले.

१२ वर्षांपासून होळी आदिवासींसोबत

आदिवासींसाठी होळी हा महत्त्वाचा सण. मेळघाटात पाच दिवस हा सण साजरा केला जातो. मेळघाटात मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत. ते आपली संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न करतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राणा दाम्पत्य गेल्या १२ वर्षांपासून होळी ही आदिवासी भागात घालवतात. आदिवासींसोबत नृत्य करतात. त्यांच्या जीवनाशी समरस होतात. त्यांच्या जीवनातील सुख-दुःख समजून घेतात. त्यासाठी राणा दाम्पत्य दरवर्षी आदिवासींसोबत वेळ घालवतात.

आदिवासींची निवेदने स्वीकारली

पहिल्याच दिवशी खासदार नवनीत राणा या आदिवासींसोबत नृत्य करताना दिसल्या. आदिवासी जीवनाशी एकरुप झाल्याचे पाहावयास मिळाल्या. आदिवासींच्या नेतृत्वाला त्यांनी सलाम केला. आदिवासी भागात कोणत्या बाबीची आवश्यकता आहे. ते कुठून देते येईल, यासाठी त्यांनी प्लानिंग केलं. तसेच आदिवासी भागातील लोकांची निवेदनं स्वीकारली. काम कशी पार पाडता येतील, याचीबाबत त्यांच्याशी संवाद साधला.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.