Amravati Police | राणा समर्थकांचा मुंबई दौरा रद्द, कार्यकर्त्यांनी न येण्याचे आवाहन; अमरावतीतील कार्यालयात पोलीस बंदोबस्त

आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा मुंबईत पोहचल्या. कार्यकर्तेही आज मुंबईच्या दिशेने रवाना होणार होते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता राणा दाम्पत्यांनी कार्यकर्त्यांना न येण्याचे आवाहन केले. त्यामुळं मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणण्याचा कार्यकर्त्यांचा मुंबई दौरा पूर्ण होऊ शकला नाही.

Amravati Police | राणा समर्थकांचा मुंबई दौरा रद्द, कार्यकर्त्यांनी न येण्याचे आवाहन; अमरावतीतील कार्यालयात पोलीस बंदोबस्त
अमरावतीच्या राजापेठ कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 22, 2022 | 5:00 PM

अमरावती : आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमानच्या (Yuva Swabhimani) राजापेठ चौकातील मुख्य कार्यालयाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलंय. रवी राणा यांच्या आवाहनाला समर्थकांचा चांगला प्रतिसाद दिला. कार्यकर्ते आज मुंबईला रवाना होणार होते. परंतु, अमरावती आणि विदर्भातून जाणाऱ्या राणा समर्थकांचा मुंबई दौरा (Mumbai tour) रद्द करण्यात आलाय. मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी निर्णय घेण्यात आलाय. मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यांना नोटीस दिलीय. राणा दाम्पत्यांनी कार्यकर्त्यांनी मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी हा दौरा रद्द केलाय. आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या महिला पदाधिकारी गीतांजली एक्सप्रेसने रवाना होणार होत्या. मातोश्रीवर हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) पठण करण्याकरता पदाधिकारी मुंबईसाठी रवाना होणार होते. परंतु, हा दौरा आता रद्द झाला आहे.

शिवसेनेच्या सोशल मीडियावर पोस्ट

आमदार रवी राणांचा समाचार घेण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांनी हजर रहावे, अशा शिवसेनेच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. आमदार रवी राणा हे हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. त्यासाठी ते मुंबईला पोहचले. परंतु, आमदार रवी राणा यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबईला जाऊ देणार नाही, अशी भूमिका अमरावती जिल्ह्यातील शिवसेनेने घेतली होती. आमदार रवी राणा यांचा समाचार घेण्यासाठी बडनेरा रेल्वे स्टेशनवर शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहनही सोशल मीडियाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. तशा आशयाच्या पोस्टदेखील आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या.

बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर जहरी टीका

निवडणुकीच्या वेळी तुमचा बाप वेगळा होता. आता तुमचा बाप बदलला आहे, अशी जहरी टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यांवर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राणा निवडूण आले हे विसरू नका. आमदार रवी राणा आणि नवनीत राणा विकासाचा मुद्दा सोडत आहेत. आम्ही शिवसैनिकांसोबत आहोत. प्रहार शिवसेनेसोबत आहे, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. रवी राणांची उंची मातोश्रीवर जाणार नाही, असंही कडू म्हणाले.

Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है

Maharashtra News Live Update : रवी राणा नवनीत राणा मुंबईत दाखल, पोलिसांकडून दाम्पत्याचा शोध

Loadshedding : ऊर्जा राज्यमंत्री तनपुरेंनाच लोडशेडिंगचा फटका; कार्यक्रमात बत्ती गुल, संकटासाठी केंद्राला लावला बोल!

अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.