रवी राणा यांची बच्चू कडूंवर खोचक टीका, काय करतो याचा पाढाच वाचला…

तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. मी तोडीबाज आमदार नाही.

रवी राणा यांची बच्चू कडूंवर खोचक टीका, काय करतो याचा पाढाच वाचला...
रवी राणा यांची बच्चू कडूंवर खोचट टीकाImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 4:52 PM

अमरावती : खासदार नवनीत राणा यांच्याकडून दिवाळाचा किराणा वाटप होत आहे. काही दिवसांपूर्वीचं राणा यांनी किराणा वाटपाचा शुभारंभ केला आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी टीका केली. एकीकंड खिसे कापायचे आणि दुसरीकडं किराणा वाटायचं, असा आरोप त्यांनी केला. यावर आमदार रवी राणा म्हणाले, मी आमदार होण्यापूर्वीपासून प्रामाणिकपणे किराणा वाटतो. गेल्या पंधरा वर्षांपासून हे काम सुरू आहे. गोरगरिबांचा कैवारी म्हणून मी काम करतो. शेतकरी संकटात होते. तेव्हा अनेक लोकं नेत्यांसोबत वावा करत होते. मी शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये होतो. उद्धव ठाकरे सरकारनं चार दिवस जेलमध्ये टाकले.

मला वाटतं बच्चू कडू सोंगाड्या आहे. मी गुवाहाटीला जाणारा आमदार नाही. बच्चू कडू जे काही आंदोलन करतात, ते तोडीसाठी करतात. तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. मी तोडीबाज आमदार नाही.

रवी राणात धमक आहे. म्हणून रवी राणा किराणा वाटते. गोरगरिबांचा उपचार करून देते. मुलांना शिक्षणासाठी मदत करते. गोरगरिबांच्या लग्नासाठी मदत करते. कोणी मृतक झाला, तर त्याच्या क्रियाकर्मासाठी मदत करते. आदिवासी कुटुंबांना रवी राणा आपला पगार देते. भीक मागणाऱ्या महिलेला घर बांधून देते. छत देते. रवी राणा छाती ठोकून लोकांना मदत करते.

बच्चू कडू यांनी आरोप करताना दहा वेळा विचार केला पाहिजे. बच्चू कडू यांचं जीवनच पैसे आहेत. निवडणुका आल्या का त्यांना पैसा पाहिजे. कुणाला पाठिंबा द्यायचा आहे तर दमडी पाहिजे. संतांच्या विचाराची वागणूक असली पाहिजे.

दिवाळीचा शिधा यावर बोलताना रवी राणा म्हणाले, लवकरच सरकारचा दिवाळीचा किराणा हा लोकांना मिळणार आहे. अनेक ठिकाणी पोहचला आहे काही ठिकाणी पोहचणार आहे. चांगली योजना आहे करता करता थोडा उशीर होतो.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रवी राणा यांनी सांगितलं की, राज्य सरकार मजबूत आहे. जनतेचे काम थांबले नाही. लोकांची कामं होत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होवो किंवा नाही त्याचा काय फरक नाही.बच्चू कडू हे बिना बुडाचे लोटे आहेत. काही असतात फितूर पलटी मारणारे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.