Video – अमरावतीच्या दर्यापुरात खाजगी वाहन चालकांकडून वसुली! वाहतूक पोलीस करतात काय?
या खासगी वाहनचालकांकडून दर्यापूर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस (Traffic Police) हे वाहनचालकांना दादागिरी करतात. त्यांच्याकडून हप्ता वसुली करीत असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येत आहे.
अमरावती : जिल्ह्यातील दर्यापूर शहरामध्ये (Daryapur City) मागील गेल्या चार ते पाच महिन्यांपासून एसटी बस चालकांचा संप सुरूच आहे. त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या दर्यापूर शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यातच खाजगी वाहन चालकांना अभय देण्यासाठी वाहतूक पोलीस पुरेपूर प्रयत्न करीत आहे. आज दर्यापूर शहरामध्ये शेकडोंच्या संख्येने खाजगी वाहन फिरत आहे. तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण भागातून दररोज खाजगी वाहने (Private Vehicles) प्रवासी घेऊन येत असतात. या खासगी वाहनचालकांकडून दर्यापूर पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस (Traffic Police) हे वाहनचालकांना दादागिरी करतात. त्यांच्याकडून हप्ता वसुली करीत असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून दिसून येत आहे.
वाहन चालू न देण्याची धमकी
जो खाजगी वाहन चालक हप्ता देणार नाही त्याचे वाहन शहरात चालू देणार नाही. अशी धमकी ट्राफिक पोलीस देत आहे. विशेष म्हणजे शहरांमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अवैधरित्या मोठं मोठे वाहने फिरत आहेत. अमरावती ते अकोला या मार्गाने शहरात मध्यरात्री अवैधरित्या गोमास दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांच्या माध्यमातून जात आहे.
पाहा व्हिडीओ
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर ट्राफिक पोलीस करतात तरी काय? pic.twitter.com/wBwCoGo5wR
— Govind Hatwar (@GovindHatwar) March 8, 2022
पोलीस निरीक्षक कारवाई करणार?
ही बाब ट्राफिक पोलिसांना माहीत आहे. तरीसुद्धा त्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. आपला खिसा गरम करून वाहने सोडून देण्यात येतात. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना कायद्याचे ज्ञान शिकवणारे ट्राफिक पोलीस हेच पैशांसाठी कायद्याचे उल्लंघन करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे अशा लाचखोर ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्यावर आता दर्यापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक काय कारवाई करणार का हे पाहणे योग्य ठरणार आहे.