Amravati Rain : पश्चिम विदर्भात रेड अलर्ट, 18 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान, अमरावती-बुलडाण्याला सर्वाधिक फटका
पश्चिम विदर्भातील 111 गावात नुकसान झाले आहे. याशिवाय 24 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. 35 जनावरे देखील मृत झालीत.
अमरावती : गेल्या तीन दिवसांपासून पश्चिम विदर्भात (West Vidarbha) पाऊस सारखा सुरू आहे. त्यामुळे पश्चिम विदर्भाला रेड अलर्ट (Red Alert) देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. धुवाधार झालेल्या पावसाने अनेक घराची पडझड झाली आहे. शेतीदेखील खरडून निघाल्यात. नागरिकांच्या घरात देखील पाणी शिरलं आहे. विभागीय आयुक्तांच्या (Divisional Commissioner) अहवालानुसार पश्चिम विदर्भात 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान 18 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. जोरदार पाऊस होत असल्याने प्रशासन देखील अलर्ट आहे. मध्यप्रदेशात जोरदार पाऊस न झाल्याने विदर्भातील सर्वात मोठ्या असलेल्या अप्पर वर्धा धरणाची पाणी पातळी मंद गतीने वाढती आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावं याकरिता टँकरने सद्या पाणीपुरवठा केला जातोय अस देखील जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी सांगितलं.
पश्चिम विदर्भातील 111 गावात नुकसान
पश्चिम विदर्भातील 111 गावात नुकसान झाले आहे. याशिवाय 24 नागरिकांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. 35 जनावरे देखील मृत झालीत. पावसामुळे जवळपास 30 घराचे मोठे नुकसान झाले आहे. नदीला पूर आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 1 पुरात वाहून गेला आहे. पश्चिम विदर्भातील नुकसानीची परिस्थिती भयानक आहे. अमरावतीतील 111 गावांना फटका बसला आहे. 6 जणांचा मृत्यू झाला. 6 जनावरेही गेलीत. 16 घरांची पडझड झाली आहे. अकोल्यात 3 जणांचा मृत्यू पावसामुळं वीज पडून झाला आहे. यवतमाळात वीज पडून 8 जणांचा गेल्या आठवड्याभरात मृत्यू झाला. बुलडाण्यात 5 जणांना तर वाशिममध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केला मेळघाटचा दौरा
मेळाटातील कोयलारी आणि पाचडोंगरी या गावात दूषित पाणी पिण्यात आल्याने चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शंभर नागरिक सद्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेची दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. तेव्हापासून आरोग्य यंत्रणा मेळघाटमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सज्ज झाली आहे. रुग्णांवर आरोग्य केंद्रात तसेच जिल्हा परिषद शाळांमध्ये व्यवस्था करून उपचार दिला जातो आहे. याच दरम्यान अमरावतीच्या जिल्ह्याधिकारी पवनीत कौर यांनी पुन्हा मेळघाट दौरा केला आहे. कोयलारी आणि पाचडोंगरी गावामध्ये पाहणी केली. रखडलेल्या पाणीपुरवठा योजनेची चौकशी त्या करणार आहे. दोषी आढल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. सद्या ग्रामसेवक निलंबित करण्यात आले आहेत. गटविकास अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. सद्या या गावाची परिस्थिती नियंत्रणात आली असल्याचं पवनीत कौर यांनी सांगितलं आहे.