Sanjay Raut : संजय राऊत दोन वर्षे जेलमध्ये राहतील, डोकं ठिकाणावर येईल, आमदार रवी राणा यांची प्रतिक्रिया
ज्या ज्या कंपन्यांमध्ये संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, त्याचीही चौकशी होणार आहे. जेलमध्ये राहिल्यानंतर संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर येईल. शिवसेना डुबविण्याचं काम संजय राऊतांनी केलंय.
अमरावती : शिवसेना खासदार संजय राऊत यांची सकाळपासून ईडीकरून चौकशी सुरू होती. त्यानंतर ईडीनं संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली. पत्रचाळ प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली. रवी राणा म्हणाले, संजय राऊत यांना खूप आधी अटक व्हायला पाहिजे होती. ईडीकडे संजय राऊतां विरोधात मोठ्या प्रमाणात पुरावे (evidence to ED) आहेत. संजय राऊत दोन ते तीन वर्षे जेलमध्ये (Will stay in jail) राहतील. जेलमध्ये गेल्यावरच संजय राऊत यांचा डोकं ठिकाणावर (head will come to place) येईल.
काय म्हणाले, रवी राणा
राऊतांची अवैध संपत्ती जप्त होणार
संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले. त्यानंतर रवी राणा म्हणाले, संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणावर भूकंप येईल. संजय राऊत यांनी यांची अवैध संपत्ती ईडी जप्त करेल. संजय राऊत यांनी आमदार रवी राणा यांच्यावर टीका केली होती. राणा दाम्पत्यांना हनुमान चालिसा प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत खूप आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्याला बबली बंटी, अशी उपमा त्यांनी दिली होती. आता संजय राऊतांना ई़डीने ताब्यात घेतल्यानंतर राणा दाम्पत्यानं संजय राऊतांचा समाचार घेतला.
शिवसेनेकडून नागपुरात आंदोलन
संजय राऊत यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापेमारी केली. सकाळी सात वाजतापासून ही छापेमारी सुरू झाली. राऊत आणि त्यांच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. राऊत यांच्या भांडूप येथील बंगल्यावर छापेमारी सुरू असताना दादारमधील फ्लॅटवर छापा मारण्यात आला. नागपुरात शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. नागपूरच्य व्हेरायटी चौकात महात्मा गांदी यांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी आंदोलन करत ईडी कारवाईचा विरोध केला. ईडी केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं बनल्याचा आरोप करण्यात आलाय.
राऊतांनी शिवसेना डुबविली
ही अटक खूप उशिरा झाली. पुराव्याच्या आधारावर अटक केली. ज्या ज्या कंपन्यांमध्ये संजय राऊत यांची पार्टनरशीप आहे, त्याचीही चौकशी होणार आहे. जेलमध्ये राहिल्यानंतर संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर येईल. शिवसेना डुबविण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. आता राऊतांची अवैध संपत्ती जप्त होईल.