“आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे”; शिवसेनेच्या मित्रपक्षातीलच आमदाराने आपली इच्छा बोलून दाखवली
आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. त्यामुळे आता लोकं आम्हाला म्हणत असतील गद्दारी का केली. मात्र लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही काही गद्दारी वगैरे काही केली नाही.
अमरावती : एकनाथ शिंदे यांनी 8-9महिन्यापूर्वी बंडखोरी केली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर शिंदे गटाने हिंदुत्वाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा नारा देत ठाकरे गटाच्या हल्ल्यावर प्रतिहल्ला चढविला. त्यामध्ये आमदार बच्चू कडू यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्यानंतर आणि आमदार बच्चू कडू गुवाहटीवरून पुन्हा महाराष्ट्रात आल्यानंतर आता प्रादेशिक पक्षांचे दिवस येणार आहेत.
आणि छोट्या छोट्या पक्षातीलच लोकं आता मंत्रिमपदावर दावा करु शकणार आहेत.आणि आमच्या पक्षासारख्याच पक्षातील लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री पदावर दावा करू शकतात अशी वक्तव्य त्यांनी त्यावेळी केली होती. त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री पदावर दावा केला होता.
त्यानंतर आजही त्यांनी अमरावतीत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, तुम्हाला जर मुख्यमंत्री बनायचय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचय असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
त्यामुळे आता शिवसेनेबरोबर ज्यांनी हातमिळवणी केली होती त्याच गटातील बच्चू कडू यांच्या दाव्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुख्यमंत्री पदावर दावा करण्याबरोबरच याविषयी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, प्रहार हा आपला स्वतःचा पक्ष आहे.
आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. त्यामुळे आता लोकं आम्हाला म्हणत असतील गद्दारी का केली. मात्र लोकांना आम्ही सांगू इच्छितो की, आम्ही काही गद्दारी वगैरे काही केली नाही. कारण प्रहार हा आमचा पक्ष आहे.
तुम्हाला मुख्यमंत्री बनायचय तर आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे असं थेट वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. त्यामुळे यापूर्वीसुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असल्याने पक्षांतर्गत वादाची शक्यता वर्तवली जात आहे.