Amravati Gold : अमरावतीतील युनियन बँकेच्या राजापेठ शाखेत ग्राहकांनी ठेवले सोने, 5 किलो 800 ग्रॅम सोने बनावट असल्याचा धक्कादायक अहवाल
अमरावतीच्या युनियन बँकेच्या राजापेठ शाखेत ठेवलेलं सोनं बनावट असल्याचा अहवाल देण्यात आला. हे बनावट सोनं तब्बल सहा किलोच्या जवळपास आहे. लोकांनी ठेवलेलं सोनं हे खरं होतं. मग, आता ते अहवालात बनावट कसं झालं, असा प्रश्न निर्माण होतो.
अमरावती : अमरावतीत 59 ग्राहकांनी बँकेत सोने ठेवले होते. त्यापैकी 5 किलो 800 ग्रॅम खरे सोने बनावट झाले. युनियन बँकेच्या राजापेठ शाखेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बँकेच्या वरिष्ठांनी दिलेल्या अहवालातून हे वास्तव समोर आलं. बँकेच्या लॉकरमध्ये (Bank lockers) ग्राहकांच्या खऱ्या सोन्याशी छेडछाड झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राजापेठ पोलिसांनी (Rajapet Police) कलम 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे (Financial Offenses Branch) सोपवला आहे. तीन ते साडेतीन कोटी सोन्याची किंमत आहे. ही चूक बँकेनं मान्य केली. बँकेनं सर्वच लॉकरचे ऑडीट सुरू केले आहेत. बँकेत ठेवलेलं खऱ्या सोन्याचं बनावट सोनं कसं झालं असा सवाल उपस्थित केला जात आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच हा अहवाल दिला. त्यामुळं ग्राहकांना धक्काच बसला. आपण दिलेलं सोनं खरं होतं. मग, त्यात कुणी छेडछाड केली असेल, असा प्रश्न उपस्थित होतोय.
युनियन बँकेच्या राजापेठ शाखेतील प्रकार
अमरावतीच्या युनियन बँकेत धक्कादायक घटना समोर आली. लोकं बँकेत सोनं ठेवतात. कारण लॉकरमध्ये ते सुरक्षित असते. परंतु, अमरावतीच्या युनियन बँकेच्या राजापेठ शाखेत ठेवलेलं सोनं बनावट असल्याचा अहवाल देण्यात आला. हे बनावट सोनं तब्बल सहा किलोच्या जवळपास आहे. लोकांनी ठेवलेलं सोनं हे खरं होतं. मग, आता ते अहवालात बनावट कसं झालं, असा प्रश्न निर्माण होतो. हे बनावट सोनं होण्यासाठी कोण जबाबदार आहे. ठेवलेल्या सोन्यासोबत कुणीतरी छेडछाड केल्याशिवाय हे शक्य नाही.
छेडछाड कुणी केली असणार?
खऱ्या सोन्याचं बनावट सोन्यात रुपांतर कसं झालं हा प्रश्न निर्माण झालाय. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तपास आर्थिक गुन्हे शाखेकडं सोपविला. आता आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करतील. ग्राहक मोठ्या विश्वासानं बँकेत सोनं ठेवतात. पण, त्यांचं खरं सोनं बनावट होत असेल, तर त्यांना धक्का बसणे साहजिक आहे. बँकेत सोन्याशी छेडछाड करण्यात बँकेतील काही कर्मचाऱ्यांचा हात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.