अमरावती : अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने अमरावतीमध्ये वातावरण पेटलं आहे. सोशल मीडियावर महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. चांदूर बाजार, मोर्शी, दर्यापूर मध्ये 11 ते 3 या वेळेत दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केलं असून दर्यापूर शहरात बाजारपेठा कडकडीत बंद ठेवला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा भवानी मातेचं दर्शन घेत असतानाच्या फोटोसोबत छेडछाड करत तो फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवला होता त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं असून निषेधार्थ बंद ठेवण्याचं आवाहन केलं आहे. आज बंदची आवाहन केलं असतानाही काही दुकानदारांनी दुकान बंद ठेवल्याने हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाच झाली, त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केल्याचं पाहायला मिळालं.
समाज कंटकाने केलेल्या वादग्रस्त पोस्टमुळे वातावरण चांगलंच तापलं होतं. जस स्तंभ चौक चांदुर बाजार पासून ते पोलीस स्टेशनपर्यंत मोर्चाही काढण्यात आला होता. यामध्ये अनेक हिंदुत्त्ववादी संघटनेच्या कार्यकर्ते सहभागी झाले होते.