अमरावती : अचलपूरमधील दोन गटांतील दगडफेक प्रकरणी आरोपींना पोलीस कोठडी (Police Cell) सुनावण्यात आली आहे. दगडफेक प्रकरणातील आरोपी भाजप शहराध्यक्ष अभय माथनेला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अचलपूरच्या न्यायालयाने (Achalpur Court) ही कोठडी सुनावली. अभय माथनेला पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधून पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी अभय माथनेला न्यायालयात हजर केले. आतापर्यंत दगडफेक प्रकरणात 27 आरोपींना पोलिसांनी अटक केली. सर्व आरोपींनी तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) अचलपूरला भेट देणार आहेत. पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांना भेटणार आहेत.
अचलपूर गावात सध्या शांतता आहे. संचारबंदी लागू आहे. गावातील नागरिकांना सकाळी सहा ते साडेनऊ अशी ती तासांची मुभा देण्यात येते. त्या वेळेत नागरिक आवश्यक वस्तू खरेदी करून आणतात. परिस्थिती पाहून हळूहळू शिथिलता देण्यात येईल, असं पोलिसांनी सांगितलं. सध्या शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. घराबाहेर पडायचं असेल तर महत्वाच्या कामासाठी बाहेर जाऊ दिले जात आहे. मेडिकल तसेच अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडण्यास बंदी आहे. अचलपूरमधील दोन गटांत झालेल्या दगडफेक प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष अभय माथने यांना अटक करण्यात आली आहे. गावात सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे. साडेतीन तासांची शिथिलता देण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत सातव यांच्याशी या विषयावर चर्चा केली.
एका गटाने झेंडा लावला होता. दुसऱ्या गटाने त्याला विरोध केला. यावरून दोन गटांत वाद निर्माण झाला. यावरून दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत वाद मिटवला. पुन्हा वाद होऊ नये, यासाठी गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अचलपूर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अभय माथने याला अटक केली. भाजपाच्या पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानं खळबळ उडाली होती. अमरावती जिल्ह्यातील अचलपुरात रविवारी रात्री दुल्हा गेट परिसरात झेंडा काढल्यावरून वाद झाला होता. दोन गटात वाद झाल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तातडीने जाऊन तणाव शांत केला. परतवाडा व अचलपूर या जुळ्या शहरात संचारबंदी लावण्यात आली आहे.