Amravati Student Death : अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, वसतिगृहात मृतावस्थेत आढळला, कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय

वसतिगृहातील व्यवस्थापन माझ्या मुलाल्या मृत्यूला कारणीभूत असल्याची तक्रार आदर्शच्या पालकांनी केली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असंही त्यांनी गाडगेनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

Amravati Student Death : अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू, वसतिगृहात मृतावस्थेत आढळला, कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय
अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यूImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 3:13 PM

अमरावती : अमरावती येथील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या व तेथीलच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. आदर्श नितेश कोगे (वय 13) रा. जामली या आदिवासी विद्यार्थ्याचा (tribal student) संशयास्पद मृतदेह सापडला. ही घटना उजेडात आल्यानंतर विद्यालय व वसतिगृह प्रशासनात एकच खळबळ उडाली. शिवाय, विद्यार्थीही चांगलेच धास्तावले. याबाबत माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह (Commissioner Dr. Aarti Singh) यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यालय व वसतिगृहाला भेट देऊन चौकशी केली. विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. अमरावती पोलीस तपास करत आहेत. मृतक आदर्शने बुधवारीच आपल्याला कॉल केला होता. वसतिगृहातील विद्यार्थी आपल्याला मारतात. आपण येथे राहत नाही, असे तो म्हणाला होता. आदर्शच्या मृत्यूस वसतिगृह व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप करत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी वडील नितेश कोगे यांनी अमरावतीच्या गाडगेनगर पोलिसांकडे (Gadgenagar Police) एका तक्रारीतून केली.

वसतिगृहात नेमकं काय घडलं

विद्याभारीत माध्यमिक विद्यालयाचे वसतिगृह आहे. या ठिकाणी तेरा वर्षीय आदर्श कोगे गेल्या काही दिवसांपासून राहत होता. पण, तो खूश नसल्याचं त्याच्या पालकांनी सांगितलं. बुधवारी आदर्शनं फोन करून मला हा वसतिगृह पसंत नाही. याठिकाणी मी राहू इच्छित नाही. वसतिगृहातील विद्यार्थी मला मारतात, अशी तक्रार केली होती. आणि नंतर त्याचा मृतदेह सापडला. त्यामुळं नेमकं वसतिगृहात काय घडलं हे कळायला मार्ग नाही.

संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

आदर्शचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर आदर्शचा मृत्यू कशा झाला हे स्पष्ट होईल. वसतिगृहातील व्यवस्थापन माझ्या मुलाल्या मृत्यूला कारणीभूत असल्याची तक्रार आदर्शच्या पालकांनी केली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असंही त्यांनी गाडगेनगर पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर आदर्शचा मृत्यू कसा झाला, हे स्पष्ट होईल. त्यानंतर वसतिगृहात नेमकं काय घडलं हे समजेल.

हे सुद्धा वाचा

वसतिगृहातील 90 विद्यार्थ्यांना पालक घरी घेऊन गेले

या प्रकरणी जवळपास 90 विद्यार्थ्यांना आई-वडील घरी घेऊन गेले. मेळघाटमधील जामली येथील आदर्श कागे या 13 वर्षाच्या विद्यार्थ्यांचा वसतिगृहात संशयास्पद मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूला महाविद्यालयात प्रशासन जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप आहे. या प्रकरणी पोलीस वसतिगृहात तपासणी करत आहेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.