अमरावतीत मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर थेट कांदे फेकण्याचा प्रयत्न

सरकारच्या आश्वासनानंतरही काही ठिकाणी कांदा खरेदी सुरु नसल्याची तक्रार सुरु आहे. त्याशिवाय कांद्याच्या दरावरुन विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. या दरम्यान अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आलीय.

अमरावतीत मोठी घडामोड, देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर थेट कांदे फेकण्याचा प्रयत्न
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Mar 05, 2023 | 4:48 PM

अमरावती : कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmer) चांगलेच आक्रमक झाले आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यातून त्यांच्या मनात सरकारबद्दलचा रोष वाढत चालला आहे. विशेष म्हणजे याच रोषातून अमरावतीत एक धक्कादायक प्रकार बघायला मिळाला. अमरावतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण कांदा फेकण्याआधीच पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार, कांदा फेकणारे तरुण हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

विशेष म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच हा प्रकार घडलेला नाही. तर कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नाशिकमध्ये निफाड तालुक्यात केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासोबत देखील असाच काहीसा प्रकार समोर आला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज थेट भारती पवार यांना घेराव घातला. निफाडमधील शिरसागाव येथे हा प्रकार घडला. नाफेडमार्फत कांद्याची खरेदी व्हावी, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.

कांद्याची खरेदी अजूनही सुरु झालेली नाही?

दरम्यान, सरकारच्या आश्वासनानंतरही काही ठिकाणी कांदा खरेदी सुरु नसल्याची तक्रार सुरु आहे. त्याशिवाय कांद्याच्या दरावरुन विरोधकांनी ठिकठिकाणी आंदोलनं सुरु केलीयत. संगमनेरमध्ये काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी ठिय्या आंदोलन केलं. तर नगर पुणे महामार्गावर राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंनी कांदा दरासाठी रास्ता रोको केला. नाफेडनं खरेदीचा वेग वाढवावा आणि कांद्याला अनुदान देण्याची मागणी त्यांनी केलीय.

हे सुद्धा वाचा

सरकारच्या आश्वासनानंतरही नाफेडनं कांदा खरेदी न सुरु केल्याच्या बातम्या आल्यानंतर लासलगावात नाफेडनं नेमलेल्या उप कंपन्यांकडून कांदा खरेदी होतोय. त्याठिकाणी कांद्याला 931 रुपये भाव मिळालाय. पण इतर काही ठिकाणी कांदा खरेदीसाठी असंख्य अटी घातल्या गेल्या आहेत. खरेदीआधी कांद्याची प्रतवारी ठरवली जातेय.

कांदा खरेदीसाठी नेमक्या कोणकोणत्या अटी?

कांदा 45 ते 55 मिलिमीटर आकाराचा असावा, रंग उडालेला नसावा, कांद्याला विळा लागलेला नसावा, पत्ती उडून कोंब फुटलेला नसावा अशा अनेक अटी लावल्या जातायत. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, 7/12 खरीप हंगाम पीक पेरा असे नियम घालून देण्यात आले आहेत.

कांदा खरेदीच्या आकडेवारीवरुन आधीच विरोधकांनी आक्षेप घेतला होता. 28 फेब्रुवारीला मुख्यमंत्री एकनाख शिंदेंनी नाफेडद्वारे २.३८ लाख टन कांदा खरेदी केल्याचा दावा केला. मात्र ही आकडेवारी गेल्या रब्बी हंगामातली असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यात नाफेडनं सुद्धा 28 फेब्रुवारीला ट्विट करत ३ दिवसात 637.38 टन कांदा खरेदी केल्याचं ट्विट केलं होतं.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.