जागा आणि वेळ सांगा, मी हजर राहीन, विक्रम ठाकरे यांचं आमदार देवेंद्र भुयार यांना आव्हान
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली.
अमरावती : जागा तुझी, वेळ तुझा सांग मी हजर असेल. काँग्रेसच्या विक्रम ठाकरे यांनी आमदार देवेंद्र भुयार यांना थेट आव्हान दिलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला धक्का लागला तर हात छाटू असं वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं होतं. त्यांना जशाच तसे उत्तर देणार असल्याचं विक्रम ठाकरे म्हणाले. अमरावतीत बोलताना देवेंद्र भुयार म्हणाले, मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. पण, तुमची दहशत नदीच्या काठापर्यंत. आमच्या नादाला लागायचं नाही. हर्षवर्धन दादाच्या नादाला तर बिलकुलचं लागायचं नाही.
शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये जाणीवपूर्वक तुम्ही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला धक्का लावलात तर तलवारीनं हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य देवेंद्र भुयार यांनी केलं. यावर विक्रम ठाकरे म्हणाले, माझं तुला आव्हान आहे. मी केदार चौकात महात्मा गांधी पुतळ्याजवळ ये. नि जुना देवेंद्र भुयार काय आहे ते दाखवं, असं आव्हान विक्रम ठाकरे यांनी दिलं.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात वरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. विक्रम ठाकरे यांची काही लोकं जमले होते.
वरुड येथे एका कार्यक्रमात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी स्थानिक विरोधकांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला धक्का लावण्याचा काम केलं तर तलवारीने हात छाटल्या शिवाय राहणार नाही, अशी भाषा त्यांनी वापरली होती.
यावर आता काँग्रेस पदाधिकारी व वरुड पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे यांनी देवेंद्र भुयार यांना एक आव्हान दिलं. शिवाजी शिक्षण संस्थेच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र भुयार यांनी मुद्दामहून राडा करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीच्या दिवशी देवेंद्र भुयार यांनी स्वतः गाडी जाळून स्वतःवर गोळीबार करण्याचा बनावाचा प्रयत्न त्यांनी केला होता.
देवेंद्र भुयार यांची कृती गुन्हेगारासारखी आहे. वरुडच्या महात्मा गांधी चौकात या व तुमचा जुना देवेंद्र भुयार दाखवा असं आव्हान काँग्रेस पदाधिकारी विक्रम ठाकरे यांनी देवेंद्र भुयार यांना दिलं. यावेळी विक्रम ठाकरे यांच्यासोबत कार्यकर्ते जमले होते. पण, देवेंद्र भुयार आलेच नाहीत. त्यामुळं पुढचा अनर्थ टळला, असचं म्हणावं लागेल.