“देश अनिश्चिततेच्या गर्तेत”; ठाकरे गटाची राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होत. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगत शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सांगितले होते.

देश अनिश्चिततेच्या गर्तेत; ठाकरे गटाची राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:13 PM

अमरावतीः शिवसेना चिन्ह आणि पक्ष हे दोन्ही शिंदे गटाला मिळाले असल्याने ठाकरे गट आक्रमक झाला आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत, विनायक राऊत यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारसह केंद्रावरही जोरदार निशाणा साधला आहे. अमरावतीमध्ये शिव जयंतीच्या निमित्ताने सुषमा अंधारे यांनी शिंदे गटासह भाजपवरही सडकून टीका केली आहे. यावेळी भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना त्यांनी सध्याच्या काळात देश हा अनिश्चततेच्या गर्तेत सापडला असल्याची गंभीर टीका भाजपवर करण्यात आली आहे.

भाजपवर आणि शिंदे गटावर टीका करताना सुषमा अंधारे यांनी अंध भक्त म्हणत भाजप समर्थकांवरही त्यांनी टीका केली आहे.

जसा घासलेटवर रिक्षा चालवण्याचा प्रयोग होता. तसा देश अंध भक्तीवर चालवण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होत. त्यानंतर शिवसेना पक्षावर आणि चिन्हावर दावा सांगत शिंदे गटाने शिवसेना आपलीच असल्याचे सांगितले होते.

त्याविरोधात न्यायालयीन लढाईही लढली गेली. न्यायालयीन लढाई सुरू झाल्यानंतर पक्ष आणि चिन्ह या दोन्ही गोष्टी शिंदे गटाला मिळाल्यामुळे आताच्या काळात स्वायत्त यंत्रणांकडूनही चुना लागत असल्याचा गंभीर आरोपही सरकारवर केला आहे.

तर अमरावती दौऱ्यावर असलेल्या सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा यांच्यावरही निशाणा साधला. त्यांच्यावर टीका करतान त्या म्हणाल्या की, मी मार्चमध्ये अमरावतीला येणार आहे, कारण मला नवनीत अक्काची गळा भेट घ्यायची असल्याचे सांगत त्यांना जोरदार टोला लगावला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरुन टीका करताना त्या म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराज हे 18 पगड जातीचे राजे होते.

शिवाजी महाराज हे सर्व धर्म समभावाचे होते. तसेच शिवाजी महाराज यांनी मुहूर्त बघून कधी लढाया केल्याही नाहीत. सध्याच्या काळात शिवाजी महाराज यांच्याबद्दल आता अनेक नेत्यांचे प्रेम ओतू चालले आहे.

मात्र ज्यावेळी भगतसिंग कोशारीसारखी माणसं विषारी वक्तव्य करत होती. त्यावेळी हे प्रेम कुठं गेलं होते असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

शिवजयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल आग्राला गेले होते. मात्र मनी नाही भाव देवा मला पाव अशी अवस्था शिंदे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.