Amaravati Crime : अचलपुरातील बेपत्ता वेदांतचा मृतदेह शेतातील विहिरीमध्ये आढळला
वेदांत 2 फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्रांसोबत खेळायला गेला होता. त्यानंतर मित्राच्या सायकलवरुन तो सकाळी 11 वाजता अचलपूरला गेला आणि पुन्हा बोर्डीला घरी परत आला. त्यानंतर 3.30 वाजता घरातून निघून गेला तो पुन्हा घरी परतलाच नाही.
अमरावती : अमरावती अचलपूर तालुक्यातील बोर्डी गावातील बेपत्ता 15 वर्षीय मुलाचा मृतदेह(Deadbody) शनिवारी सकाळी घराजवळील शेतातील विहिरीत आढळून आला. वेदांत सुरेश तट्टे (Vedant Suresh Tatte) असे मयत मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वेदांत हा 2 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांकडून सर्वत्र त्याची शोधाशोध सुरु होती. याप्रकरणी समरसपुरा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली असून वेदांतने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याचा पोलीस तपास करीत आहेत. वेदांतच्या घरी दोन बहिणी आणि आई-वडिल आहेत. वेदांत तट्टे हा अचलपूर येथील सिटी हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत होता. (The body of a missing Vedanta from Achalpur was found in a field well)
वेदांत 2 फेब्रुवारीपासून बेपत्ता होता
वेदांत 2 फेब्रुवारी रोजी त्याच्या मित्रांसोबत खेळायला गेला होता. त्यानंतर मित्राच्या सायकलवरुन तो सकाळी 11 वाजता अचलपूरला गेला आणि पुन्हा बोर्डीला घरी परत आला. त्यानंतर 3.30 वाजता घरातून निघून गेला तो पुन्हा घरी परतलाच नाही. वेदांत घरी परतला नाही म्हणून त्याच्या घरचे त्याला बोलवायला गेले. पण तो सापडला नाही म्हणून कुटुंबियांनी इतरत्र सर्वत्र शोधाशोध केली. वेदांतच्या मित्रांकडेही त्याची चौकशी करण्यात आली मात्र कुठेही थांगपत्ता लागला नाही. अखेर वेदांतच्या वडिलांनी सरमसपुरा पोलिसात तो बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
विहिरीत मृतदेह आढळला
गेल्या दोन दिवसांपासून परिजनांसह गावकरी, पोलीस त्याचा शोध घेत होते. काल सकाळी रमेश तट्टे यांच्या विहिरीत ओलितासाठी गेलेल्या मजुराला दुर्गंधी येत असल्याने त्याने डोकावून पाहिले असता त्याला विहिरीत मृतदेह आढळला. तात्काळ ही बाब पोलिसांना सांगितल्यावर तपास केला असता तो बेपत्ता वेदांतचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलाचा मृतदेह पाहताच आईने एकच हंबरडा फोडला घटनास्थळी सरमसपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वाणी, जमादार संजय उइके, घनश्याम किरोले, संदीप वाघमारे यांनी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला व अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. वेदांत विहिरीपर्यंत कसा गेला ? त्याच्यासोबत नेमकं काय घडलं ? ही आत्महत्या की घातपात ? या बाबींचा तपास पोलिस करीत आहेत. (The body of a missing Vedanta from Achalpur was found in a field well)
इतर बातम्या
11 वर्षांचे प्रेमसंबंध, मुंबईतील 28 वर्षीय तरुणीचा पालघरमध्ये खून, वयाने लहान बॉयफ्रेण्डला अटक
दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार