येथील कालीमाता मंदिरात पैशांच्या प्रसादाचे वाटप, मंदिर परिसरात गर्दी तर होणारच
या मंदिराचे पुजारी येणाऱ्या भविकाना लाह्यांसोबत पैसे वाटतात.
अमरावती : दिवाळी सणानिमित्त भाविक (Devotees) ही लक्ष्मी देवीची पूजा करतात. वैभव संपत्ती व धनसंपन्नतेचे प्रतीक म्हणजे महालक्ष्मी देवी. अमरावतीच्या (Amravati) अशाच एका मंदिरात मागील 38 वर्षांपासून भाविकांना चक्क पैशाचा प्रसाद देण्यात येतो. त्यामुळे येथे दिवाळीच्या दिवसांमध्ये भक्तांची मोठी रीघ लागलेली असते. अमरावती येथील काली माता मंदिरात (Kali Mata Temple) मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. त्याचे कारणही तसेच आहे. मागील तीस वर्षापासून या मंदिरात मोठ्या प्रमाणात भक्तांना प्रसाद स्वरूपात पैशाचे वितरण (Money Distribution) करण्यात येते.
या मंदिराचे पुजारी येणाऱ्या भविकाना लाह्यांसोबत पैसे वाटतात. या मंदिराचे पुजारी शक्ती महाराज सांगतात की १९८४ पासून अमरावती स्मशानभूमी परिसरातील काली माता मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात.
या ठिकाणी दिवाळीच्या निमित्त पैशाच्या प्रसादाची वितरण करण्यात येते. याची कारण सांगताना शक्ती महाराज सांगतात की, येथील पैसे आपल्या दुकान घर आणि तिजोरीमध्ये ठेवल्यास बरकत मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.
दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मीपूजन आटोपून भाविक प्रामुख्याने या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येतात. या ठिकाणी लाह्याबत्ता असे व मिठाईच्या वितरणासह पैसे सुद्धा देण्यात येतात.
पैसे दिल्यानं तो पैसा खेळत राहतो. पैसा तिजोरीत ठेवण्यापेक्षा फिरता राहिला पाहिजे. यातून समाजाची उन्नती होते. आर्थिक चक्र सुरळीत सुरू राहतो, अशी भावना आहे.
कालीमातेच्या मूर्तीच्या आजूबाजूला पैसे ठेवलेले आहेत. लक्ष्मीचं पूजन बहुतेक जण करतात. पण, लक्ष्मीचा प्रसाद वाटणारे खूप कमी आहेत. त्यामुळं अमरावती येथील या कालिमातेच्या मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. कालिमातेचा प्रसाद पैशाच्या रुपात मिळतो. त्या पैशांचा योग्य उपयोग केला जातो.