…हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचं साटंलोटं; या नेत्याने थोपाटले दंड राजकुमार पटेल यांच्या उमेदवारीवरून महायुतीत ठिणगी

CM Eknath Shinde -Bachhu Kadu : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला होता. एक घाव दिला आता आम्ही दहा घाव देऊ असे ते म्हणाले होते. पण आता या स्टोरीत एक ट्विस्ट आला आहे.

...हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांचं साटंलोटं; या नेत्याने थोपाटले दंड राजकुमार पटेल यांच्या उमेदवारीवरून महायुतीत ठिणगी
तर राजकुमार पटेल यांच्याविरोधात काम करणार
Follow us
| Updated on: Oct 08, 2024 | 12:27 PM

मेळघाट तसा कायम कुषोषणासाठी परिचित आहे. पण सध्या राजकीय उमेदवारीवरून हा परिसर चर्चेत आला आहे. प्रहार जनशक्ती पार्टीचे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे सध्या शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. कडू यांनी राज्यात महायुतीचा हात सोडून तिसऱ्या आघाडीचा प्रयोग राबवला आहे. त्यातच पटेल हे जवळचे मित्र असले तरी त्यांच्याविरोधात उमेदवार देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्र्यांनी एक घाव दिला आता आम्ही दहा घाव देऊ असे ते म्हणाले होते. पण आता या स्टोरीत एक ट्विस्ट आला आहे.

काय म्हणाले होते बच्चू कडू?

राजकुमार पटेल यांच प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे, असा आरोप बच्चू कडू यांनी केला. अजूनही दोन तीन महत्त्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला. प्रत्येकाच वैयक्तिक स्वार्थ असत ते त्यांनी करावं. ते तिथे जात आहे त्यांनी तिथे सुखी राहाव.राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवून राजकुमार पटेल विरोधात उमेदवार देऊ, असे त्यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

आमदार रवी राणा आक्रमक

प्रहारचे राजकुमार पटेल यांना शिवसेना शिंदे गटात बच्चू कडू यांनीच पाठवलं असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बच्चू कडू यांच्यात साठ गाठ आहे. तर बच्चू कडू यांचीच ही खेळी आहे असा आरोप रवी राणा यांनी केला. त्यामुळे आता राजकुमार पटेल यांच्या उमेदवारीवरून महायुतीतच ठिणगी पडल्याचे दिसून आले आहे.

तर विरोधात काम करू

शिवसेनेने मेळघाटमध्ये राजकुमार पटेल यांना उमेदवारी दिल्यास आम्ही विरोधात काम करू.असा इशारा राणा यांनी दिला आहे. आमदार बच्चू कडू सोयीनुसार राजकारण करतात, असा आरोपही यावेळी त्यांनी केला. येणाऱ्या काळात बच्चू कडू यांचा हिशोब ठेवू असा इशाराही राणा यांनी दिला. “बाप बडा ना भय्या सबसे बडा रुपया” अश्या प्रकारे बच्चू कडू यांच राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.