सुरेंद्रकुमार आकोडे, अमरावती : राज्यात (Amravati News) काही जिल्ह्यात वातावरण बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिक मोठ्या संभ्रमात सापडले आहेत. दिवसभर उन्हाचे चटके, रात्री थंडीची हुडहुडी यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात आजारी पडले आहेत. त्याचबरोबर या वातावरणाचा फटका सुध्दा शेतकऱ्यांना (Farmer) बसत आहे. विविध पीक काढणीला आली आहेत. त्यावर या वातावरणाचा परिणाम होत आहे. बदलत्या वातावरणामुळे (Due to the changing environment) सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
अमरावतीत दिवसा उन्हाची तीव्रता आणि रात्री तसेच पहाटेच्या वेळी थंडी अशा वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. वातावरणातील उकाडा वाढत असल्याने आता उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. कधी थंडी तर कधी काही तासातच उकडा असा वातावरणाचा अनुभव असतानाच हा हिवाळा की उन्हाळा असा प्रश्न नागरिकांना पडतं आहे. वातावरणातील बदलाचा फटका शेतकऱ्यांनाही बसला आहे. सद्या सर्दी, खोकला आणि ताप अशा आजारांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन महिन्यांपासून अमरावती जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. काही दिवसांपासून वातावरणात बदल होत आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी नागरिकांना स्वेटर मफलर कान टोप्या वापरावे लागतात. सकाळी शाळेत जाणाऱ्या चिमुकल्यांना सुद्धा स्वेटरचा वापर करावा लागतोय. सकाळी दहा नंतर कडक उन्हाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. ग्रामीण भागात तर आतापासूनच पाणीटंचाईचा झळा लागण्यास सुरुवात झाली आहे.