Navneet Rana : खासदार नवनीत राणांवर कोणता गुन्हा दाखल?, मुलाच्या वडिलांनी काय केली होती तक्रार
मुलाच्या वडिलांनी माझी बदनामी केल्याची तक्रार दिली होती. तसेच मला धमकी दिल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून हा गुन्हा राजापेठ पोलिसांनी दाखल केलाय.
अमरावती : अखेर खासदार नवनीत राणा यांच्यावर अदखलपात्र गुन्हा (Indictable Offence) दाखल झालाय.अमरावती येथील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय. चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस (Rajapet Police) स्टेशनमध्ये जाऊन राडा घातला होता. खासदार नवनीत राणा यांच्या विरोधात मुस्लीम मुलाचे वडील यांनी केली तक्रार दाखल केली होती. या तक्रारी वरून पोलिसांनी कलम 500 बदनामी करणे (Defamation) आणि कलम 506 धमकी देणे अशी कलम लावली.
पीडित मुलाच्या वडिलांनी केली तक्रार
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा चार दिवसांपूर्वी लव्ह जिहादचा आरोप केला होता. आरोप करण्यात आलेल्या मुलाच्या वडिलांनी या प्रकरणी राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्यांने कॉल रेकॉर्ड केल्याचा आरोप करत राणांनी पोलिसांशी हुज्जत घातली होती. त्यावरूनही पोलीस पत्नीनं पुढाकार घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
पोलीस ठाण्यात राडा
नवनीत राणा यांनी अमरावतीमधून घरून गेलेली 20 वर्षीय तरुणी लव्ह जिहादचा शिकार झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणात नवनीत राणा यांनी राजपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे याना फोन केला. हा फोन कॉल पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी रेकॉर्ड केल्याचा आरोप करत नवनीत राणा यांनी केला. राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये हंगामा केला होता.
बदनामी आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा
अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यासुद्धा राणा दाम्पत्याच्या नेहमी निशाण्यावर असतात. त्यामुळं राजापेठ पोलिसांनी अखेर नवनीत राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. याचं कारण मुलाच्या वडिलांनी माझी बदनामी केल्याची तक्रार दिली होती. तसेच मला धमकी दिल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. यावरून हा गुन्हा राजापेठ पोलिसांनी दाखल केलाय.