Audio Clip : नुपूर शर्माबद्दल का पोस्ट टाकली म्हणून धमकीचा फोन, व्हिडीयोतून माफी मागा नाहीतर…, ऑडिओ रेकॉर्डिंग tv9 च्या हाती

माझं ऐकता का. कोणत्यातरी गृपमध्ये मला तो व्हिडीओ आला. दोन-तीन सिलेक्ट करतो. तेव्हा चुकीनं तो सिलेक्ट झाला. मला लक्षात येताच. मी चार मिनिटांत तो डिलीट केला. लाईट येताच मी व्हिडीओ बनवून पाठवितो.

Audio Clip : नुपूर शर्माबद्दल का पोस्ट टाकली म्हणून धमकीचा फोन, व्हिडीयोतून माफी मागा नाहीतर..., ऑडिओ रेकॉर्डिंग tv9 च्या हाती
नुपूर शर्माबद्दल का पोस्ट टाकली म्हणून धमकीचा फोनImage Credit source: File photo
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 2:46 PM

अमरावती : अमरावतीत नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली म्हणून उमेश कोल्हे (Umesh Kolhe) यांची हत्या करण्यात आली होती. अनेकांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यात. माफीसुद्धा मागावी लागली. आता एक पुन्हा धमकी देणारी नुपूर शर्माबद्दल पोस्ट का टाकली म्हणून एका व्यक्तीला फोनवरून धमकी आली. त्याची ऑडिओ क्लिप हाती लागली आहे. यात तुम्ही पोस्ट सोशल मीडियावर (Social Media) का व्हायरल केली. तुमच्या दुकानात येऊ का? (Do Come To The Shop) लवकर डिलीट करा व व्हिडिओ करून माफी मागा. नाही तर तुमचे बरे वाईट करू. आम्ही तुमच्या धर्माविरोधात बोलत नाही. हे तुम्ही चुकीचे करीत आहे, अशी धमकी एकाने दिली. पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीने माफी मागितली. मात्र पुढचा व्यक्ती ऐकायला तयार नव्हता.

ऑडिओ क्लीपमध्ये नेमकं काय?

फोन घेणारा – कोण बोलताय. फोन करणार – तुम्ही जो स्टेटस ठेवलाय. त्याबद्दल बोलायचंय. फोन घेणारा – त्याच काय झालं. घाई गडबडीत… फोन करणार – तुमच्या दुकानात यावं लागेल का? फोन घेणारा – मी तुमची हात जोडून माफी मागतो. माझं म्हणणं ऐका. फोन करणार – व्हॉट्सअपवर व्हिडीओ का टाकला मग? फोन घेणारा – कोणत्यातरी गृपवर आला. फोन करणारा – तुम्हाला व्हिडीओ क्लीप बनवावी लागेल. त्यात माफी मागावी लागेल. मी जी चूक केली. त्याची माफी मागतो. नाही तर आम्ही दुकानात पोहचतोच. फोन घेणारा – ठीक आहे. मी माफीचा व्हिडीओ तयार करून पाठवितो. मी हात जोडून तुमची माफी मागतो. फोन करणार – स्टेटस ठेवलं हे चुकीचं केलं. भेटावं लागेल का. आम्ही तुमच्या धर्माबद्दल काही बोललो का? आमच्या धर्माबद्दल काही वाईट म्हटलं तर गळा कापायलाही आम्ही मागेपुढं पाहत नाही.

फोन घेणारा – मी समजू शकतो. मी पूर्ण समाजाची हात जोडून माफी मागतो. फोन करणार – भोपाल राठीनं बनविला तसा व्हिडीओ क्लीप बनवा. तो व्हायरल करा. यापुढं अशी चुकी करू नका. नाहीतर मी आता येऊन दुकानात भेटतो. फोन घेणारा – माझं ऐकता का. कोणत्यातरी गृपमध्ये मला तो व्हिडीओ आला. दोन-तीन सिलेक्ट करतो. तेव्हा चुकीनं तो सिलेक्ट झाला. मला लक्षात येताच. मी चार मिनिटांत तो डिलीट केला. लाईट येताच मी व्हिडीओ बनवून पाठवितो. फोन करणार – गोपाल राठीचाही चुकीनं झाला होता. अशा नाटकं कशाला करता. आता माफीचा व्हिडीओ बनवा आणि माझ्या व्हॉट्सअपवर टाका. अर्ध्या तासात माझ्या व्हॉट्सअपवर माफीचा व्हिडीओ हवा.

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.