शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी

राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

शेतकऱ्यांच्या वीज तोडणीविरोधात युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक; अंजनगाव सुर्जीत उंच टॉवरवर विरूगिरी
अंजनगाव सुर्जी येथील टॉवरवर चढलेले स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते.
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 1:12 PM

अमरावती : युवा स्वाभिमानीचे तीन कार्यकर्ते (Youth Swabhiman activists) मातंगपुरा येथील टॉवरवर चढले. राज्य सरकार शक्ती करत आहे. वीज कापून पाणीपुरवठा बंद करत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांवर मरणाची पाळी आली आहे. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार रवी राणा (MLA Ravi Rana), खासदार नवनित राणा (MP Navneet Rana) हे शेतकऱ्यांसाठी लढा देत राहतात. त्यांच्या कार्यातून प्रेरित होईन हे आंदोलन उभारल्याचं या तीन कार्यकर्त्यांचं म्हणण आहे. अजय देशमुख, विठ्ठल ढोले आणि उमेश कोकाटे असे या तीन कार्यकर्त्यांची नाव आहेत. शेतकऱ्यांची वीज कापणे बंद करावे. अन्यथा हे आंदोलन सुरूच राहील. बळजबळीने उतरविण्याचा प्रयत्न केला. तर येथून उड्या घेऊन आत्महत्या करू, असा इशारा या तीन पदाधिकाऱ्यांनी दिली. या आंदोलनाची दखल घ्यावी, असे आवाहन या कार्यकर्त्यांनी केले आहे.

वीज बिल माफ करण्याची मागणी

ज्या शेतकऱ्यांकडे शेतातील कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या शेतातील वीज जोडणी ही महावितरणकडून तोडली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गहू, हरबरा, कांद्यासह अन्य पिकांना फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, यासाठी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील एका उंच टॉवरवर चढून महावितरण व राज्य सरकार विरोधात वीरूगिरी आंदोलन सुरू केली आहे. राज्य सरकारने तात्काळ शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे अशी मागणी देखील या आंदोलकांनी केली आहे. दरम्यान, मागणी पूर्ण न झाल्यास आत्महत्येचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. दरम्यान सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. ते या कार्यकर्त्यांना उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

Nagpur NMC | नदी काठावरील अतिक्रमणाविरुद्ध मोठी कारवाई; न्यायालयाच्या आदेशानंतर नागपूरचे मनपा आयुक्त म्हणाले…

Nagpur Corona | नागपूरच्या जिल्हाधिकारी म्हणतात, कोरोनाला गंभीरतेने घ्या; महिनाभरात शंभरावर मृत्यू

Nagpur Police | नागपूर पोलिसांवर कोरोनाचा मोठा आघात; दीडशेच्या वर पोलीस पॉझिटिव्ह, हायजिनीक किटचे वाटप

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.