Amruta Fadnavis यांना मानसिक तज्ज्ञांची गरज, Rupali Chakankar यांचा पलटवार
सुपर मार्केटमध्ये वाइन (Wine) ठेवण अयोग्य आहे. वाइन ही दारूच असल्यांचं मत अमृता फडणवीस (Amrut Fadnavis) यांनी व्यक्त केलंय. महाविकास आघाडी सरकारवर त्यांनी टीका केली. तर या आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्या तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलंय.
सुपर मार्केटमध्ये वाइन (Wine) ठेवण अयोग्य आहे. वाइन ही दारूच असल्यांचं मत अमृता फडणवीस (Amrut Fadnavis) यांनी व्यक्त केलंय. त्या लोणवळ्यात माध्यमांशी बोलत होत्या. वाइन ही दारूच आहे, सुपर मार्केटमध्ये ठेवणं अयोग्य आहे. लहान मूल, महिला नेहमी त्या ठिकाणी जातात. वाइन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केलाय. तर या आरोपांना राष्ट्रवादीच्या नेत्या तसंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलंय. पदावर नसताना राजकीय वक्तव्ये कशासाठी असा सवाल करत त्यांना मानसिक तज्ज्ञांची गरज असल्याचंही चाकणकर म्हणाल्या. अशापद्धतीचं ट्विट करणं म्हणजे आत्मचिंतनाची गरज असल्याचंही त्या म्हणाल्या.
Published on: Feb 04, 2022 01:42 PM