माझ्या लाडक्या पती देवाच्या लाडक्या बहिणी… ‘मी पुन्हा येईन’चा नारा देत अमृता फडणवीसांची तूफान बॅटिंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुण्यातील कार्यक्रमात महिलांना प्रेरणादायी भाषण केले. त्यांनी "मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना"चा उल्लेख करून एक उखाणाही घेतला. त्यांनी महिलांना मनमोकळेपणे जगण्याचा आणि विरोधी विचारांनाही हास्याने सामोरे जाण्याचा सल्ला दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे महत्त्व वाढले.

माझ्या लाडक्या पती देवाच्या लाडक्या बहिणी... 'मी पुन्हा येईन'चा नारा देत अमृता फडणवीसांची तूफान बॅटिंग
अमृता फडणवीस यांनी घेतला खास उखाणा
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 9:25 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, अमृता फडणवीस यांनी पुण्यातील एका खास कार्यक्रमाला हजेरी लावली होती पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवत किरण दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खास कार्यक्रमात , महिला मेळाव्यात विशेष उपस्थिती लावताना अमृता फडणवीस यांनी दिलखुलासपणे बोलत जोरजार बॅटिंग केली. माझ्या लाडक्या पतीदेवाच्या लाडक्या बहीणी म्हणत त्यांनी समोरच्या महिलांशी आपलं नणंद- भावजयीचं नातं असल्याचं सांगत उशीरा येण्याबद्दल मी सॉरी तर म्हणणार नाही, मी बसं एढचं म्हणेन की ‘मी पुन्हा येईन’ असा नारा देत पुन्हा येईन तेव्हा लेट येणार नाही, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी हसतखेळत, मजेशीर अंदाजात भाषण केलं.

देवेंद्र फडणवी, मुख्यमंत्री असताना, नंतर ते उपमुख्यमंत्री असताना आणि आता पुन्हा मुख्यमंत्री बनले , पण आधीपासूनच यअमृता फडणवीस यांनी त्यांना खंबीर साथ दिली. त्या विविध सामाजिक कार्यक्रमात अग्रेसरपणे सहभागी होता, समाजोपयोगी कामं करतानाही दिसतात. राज्यभरात विविध ठिकाणी महिलांसाठी जे मेळावे आयोजित केले जातात, तिथेही त्या हजेरी लावतात. महायुतीच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची सर्वत्र चर्चा असते, त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यशही मिळालं.

घेतला खास उखाणा

राज्य सरकारच्या याच योजनेचा विविध नेत्यांकडूनही प्रसार सुरू असतो, उल्लेख होत असतो, अमृता फडणवीस यांनीही वेळोवेळी सरकारी योजनेचा प्रचार आणि प्रसार केल्याचं या आधीही दिसून आलं आहे. काल पुण्यातील कार्यक्रमातही त्यांनी याच योजनेचा उल्लेख करत उपस्थित महिलांसाठी, लाडक्या बहिणींचा खास उल्लेख केला. आज या कार्यक्रमात हळदी-कुंकूही ठेवलेलं आहे, त्यामुळे मी येथील महिलांसाठी खास चार ओळी लिहून आणल्या आहेत, असं सांगत अमृता फडणवीस यांनी एक मस्त उखाणा घेतला . ‘ आज माझ्या नणंदा दिसत आहेत खास, देवेंद्रजी तुमच्या पाठिशी आहेत, प्रगति व्हावी तुमची झकास’ असा मस्त उखाण त्यांनी घेताच, टाळ्यांचा कडकटाड झाला.

महिलांना दिला विशेष कानमंत्र

आपल्याल जर छान, हेल्दी जगायचं असेल तर रोज हसायचं. कोणी काही टोला मारला, टोमणा लगावला तरी तरी तो ऐकायचा आणि सोडून देऊन हसायंच, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. मी तेच केलंय, माझ्या जीवनात मला जे ठीक वाटतं ते मी केलं, माझ्या मुलीसाठी पण पुढे मी एक वाट मोकळी करून शकेन असं वाटलं, ते मी केलं. माझ्ंलग्न झाल्यानंतरही मी गाणं सुरू ठेवणं असो, नाचणं असो, बँकिंग असो, मी ते सगळं चालू ठेवलं. कोणीही मला टोला मारला , टोमणे ऐकवले तर मी ते फक्त ऐकायचे, हसायचे आणि पुढे निघून जायचे, असं अमृता फडणवीस यांनी नमूद करत महिलांना दिलखुलासपणे, मनमोकळेपणे जगत पुढे जायचा मोलाचा सल्ला दिला.

'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.