मुंबई : अल्पसंख्याकमंत्री मलिक यांच्या आरोपानंतर मुंबई रिव्हर अँथममधून जयदीप राणाचं नाव हटवण्यात आलं. नाव का हटवण्यात आलं असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना निगेटिव्ह कॅरेक्टर असल्याचे वाटल्यामुळे त्यांनी नाव काढलं तर काय चुकीचं आहे, असा प्रतिप्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलाय. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात अटक झालेल्या जयदीप राणाचे संबंध विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला. या आरोपानंतर राज्यात खळबळ उडाली असून ते करताना मलिक यानी ट्विटरवर काही फोटो अपलोड केले आहेत. नंतर लगेच मुंबई रिव्हर अँथममधून राणा यांचे नाव हटवण्यात आले. अमृता फडणवीस मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
रिव्हर मार्चाल तो तो ड्रग्जमध्ये आहे याची माहिती नसेल. त्यानंतर आता म्हणून त्याचं नाव कट केलं असेल. तीन चार वर्षांनी सेंट्रल एजन्सीने त्याला पकडलं. त्यांना वाटलं हे निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यांनी नाव काढलं यात चुकीचं आहे. मलिक यांनी जाणीवपूर्वक आरोप केले. आमच्याकडे काहीच नाही. त्यामुळे काहीही एक्सपोज करु शकणार नाहीत. आमच्याकडे जमिनी नाही, साखर कारखाने नाही, त्यामुळे ते आरोप करणारच. पण आम्ही कुणाला घाबरत नाही,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या.
तसेच पुढे बोलताना, मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं या गाण्यात बॉलिवूडचे अनेक कलाकार सहभागी झाले. मीही झाले. देवेंद्र फडणवीसही झाले. त्यानंतर रिव्हर मार्चनेही आमच्यासाठी एक गाणं बनवा, असं त्यांना सांगितलं. सचिन गुप्तांनी त्याला होकार दिला. त्यानंतर सचिन गुप्ताने दिग्दर्शनासाठी मदत केली. तर रिव्हर मार्चने गाणं तयार केलं. फुकटात गाणं तयार केलं. त्या गाण्यात कोळी समाज आणि डब्बेवाले आले. ते एक पैसा न घेता आले. मनात आलं असतं तर शाहरुख आणि सलमानलाही घेतलं असतं, असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
नवाब मलिक यांनी नेमके काय आरोप केले ?
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करून एकच खळबळ उडवून दिली. “जयदीप राणाचा मी फोटो आज ट्विट केला. जयदीप राणा हा सध्या जेलमध्ये बंद आहे. जयदीप राणा 2020 दिल्लीच्या केसमध्ये सध्या जेलमध्ये बंद आहे. ड्रग्ज ट्रॅफिकिंगच्या प्रकरणात त्याला अटक झाली आहे. पण, त्यांचे संबंध महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्यासोबत आहेत. फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हा त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नदी स्वच्छता मोहीमेविषयी गाणं केलं होतं. त्यात सोनू निगम आणि फडणवीसांच्या पत्नी यांनी गाणं गायलं होतं. फडणवीसांनी, सुधीर मुनगंटीवारांनी अभिनय केला होता. त्या गाण्याचे फायनान्स हेड जयदीप राणा होते. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत,”असा दावा मलिकांनी केला. इतकंच नाही तर गणपतीच्या दर्शनासाठी फडणवीस आणि जयदीप राणा हे एकत्र दिसत असल्याचा फोटो आहेत, असं सांगून त्यांनी खळबळ उडवून दिली.
इतर बातम्या :
NEET UG Result 2021 declared | नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या रिझल्ट कसा पाहावा ?
खबरदार, माझ्या अंगावर कोणी आलं तर सोडणार नाही, अमृता फडणवीस कडाडल्या