VIDEO: मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा, सामान्य स्त्री म्हणून ट्विट करते: अमृता फडणवीस

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबईतील विकास कामांच्या मुद्द्यावरून महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. मी मुंबईतील समस्यांबाबत ट्विट करते. त्यावर बोलते.

VIDEO: मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा, सामान्य स्त्री म्हणून ट्विट करते: अमृता फडणवीस
VIDEO: मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा, सामान्य स्त्री म्हणून ट्विट करते: अमृता फडणवीस
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 1:21 PM

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी मुंबईतील विकास कामांच्या मुद्द्यावरून महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. मी मुंबईतील समस्यांबाबत ट्विट करते. त्यावर बोलते. ते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी म्हणून बोलत नाही. मी फडणवीसांची पत्नी आहे हे तुम्ही विसरून जा. मीही सामान्य नागरिक आहे. मीही घराबाहेर पडते. मलाही समस्यांचा सामना करावा लागतो. मलाही ट्रॅफिकच्या समस्यांना सामोरे जावे लागते, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी महापालिकेच्या (bmc) कामांचे वाभाडे काढले. कालच मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेचा 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. त्यानंतर आज अमृता फडणवीस यांनी थेट महापालिकेवरच निशाणा साधला आहे. अमृता फडणवीस या मीडियाशी बोलत होत्या.

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

खिसे भरू लागले तर टीका होणारच

मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच नॉटी वगैरे नावं लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या.

स्त्रियांवर वैयक्तिक टीका नको

यावेळी त्यांनी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. खासगी आयुष्य आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. पर्सनल कमेंट करू नये. एखाद्या नेत्याने पत्नीला पार्टनर केलं, तिला काही कंपनीत रोल दिला. तिथे जर घोटाळा झाला तर त्याबाबतही सावध भूमिका असायला हवी. मला वाटतं स्त्रियांनी आपल्या देशात अधीच खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणं आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात नेहमी हेच होतं. कोणी काही बोललं की त्यावर आपण आंदोलन करतो. पण या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. आपणच ठरवलं पाहिजे काय बोलावं आणि काय बोलू नये. स्त्रियांच्यांवर अत्याचार होतात तेव्हाच आपण बोलतो किंवा कारवाई करतो. पण आता आपल्याला आपल्या मानसिकतेत रिव्हॉल्यूशनरी चेंज आणावा लागेल, असं त्या म्हणाल्या.

मी नॉन पॉलिटिकल

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पुरोगामी असल्याचा दावा केला. भाजप-संघ पुरोगामी आहेत. ते स्त्रियांचा मान ठेवतात. मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे. पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांचा जर कोणी सर्वाधिक आदर देत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा दावाही त्यांनी केला.

संबंधित बातम्या:

Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली?

Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?

Bandatatya Karadkar: कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.