Amul Milk Price Hike : अमूल दूध महागलं! प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढ, नवी दरवाढ कधीपासून लागू?

| Updated on: Feb 28, 2022 | 5:57 PM

तुमच्या घरी रोज येणारं अमूलचं दूध महागलं आहे. देशभरात अमूलच्या दूधदरात वाढ करण्यात आल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय. प्रति लीटर 2 रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे.

Amul Milk Price Hike : अमूल दूध महागलं! प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढ, नवी दरवाढ कधीपासून लागू?
अमूल दुधाच्या किंमतीत वाढ
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शहरातील सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींसाठी महत्वाची बातमी आहे. तुमच्या घरी रोज येणारं अमूलचं दूध (Amul Milk) महागलं आहे. देशभरात अमूलच्या दूधदरात वाढ (Milk Price Hike) करण्यात आल्याची घोषणा कंपनीकडून करण्यात आलीय. प्रति लीटर 2 रुपयांनी ही दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ 1 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. अहमदाबाद (Ahemadabad) आणि सौराष्ट्रा अमूल गोल्ड दुधाची किंमत 30 रुपये प्रति अर्धा लीटर, तर अमूल ताजा दुधाची किंमत 24 रुपये प्रति अर्धा लीटर, तर अमूल शक्तीची किंमत 27 रुपये प्रति अर्धा लीटर आहे.

अमूलने दूध दरवाढीबाबत एक पत्रक काढलं आहे. त्यानुसार 2 रुपये प्रति लीटर ही दरवाढ केवळ 4 टक्के होते. ही दरवाढ सध्याच्या महागाईच्या तुलनेत खूप कमी आहे. अमूलच्या म्हणण्यानुसार कंपनीने मागील दोन वर्षात फ्रेश दूध कॅटेगरीच्या दुधाच्या किमतीत केवळ 4 टक्के दरवाढ केली आहे. एनर्जी, पॅकेजिंग, परिवहन, पशु आहाराच्या लागवडीतील दरवाढ यामुळे अमूल कंपनीने दुधाच्या दरात वाढ केल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आलीय.

दुग्धजन्य पदार्थ महाग होणार

दुधाच्या किंमतीत वाढ झाल्याने अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढतील. आता दूध महाग झाल्यामुळे चहा, कॉफी, मिठाई आणि चॉकलेटशिवाय तूप, पनीर, लोणी, चीज, लस्सी, आईस्क्रीम आणि ताक यांचे भावही वाढतील. अशा परिस्थितीत दुधाच्या वाढत्या किंमतींबरोबरच सर्वसामान्यांच्या अर्थिक बजेटला आणखी एक झटका बसला आहे.

अमूलचे देशभराच 31 प्लान्ट्स

अमूलचे देशभरात 31 प्लान्ट्स आहेत. त्यापैकी 13 प्लान्ट्स केवळ गुजरातमध्ये आहेत. याशिवाय दिल्ली एनसीआरमध्ये 4 प्लान्ट्स, उत्तर प्रदेशात 2, महाराष्ट्रात 4, राजस्थानमध्ये 3 प्लान्ट्स आहेत. याशिवाय छत्तीसगड, आसाम, मध्य प्रदेश, झारखंड आणि जम्मू काश्मीरमध्ये प्रत्येकी एक-एक प्लांट आहे.

इतर बातम्या :

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर राज्यपालांचं स्पष्टीकरण, काय म्हणाले कोश्यारी?

आता राज्यात वीज निर्मिती केंद्र तिथे जैवविविधता उद्याने, ऊर्जा मंत्र्याची मोठी घोषणा