Accident : काळजाचा तुकडा उराशी घट्ट धरावा, तसं एका जीवासाठी यकृत घेऊन जात होते, वाटेतच रुग्णवाहिकेचं टायर फुटलं…

रुग्णवाहिकेच्या अपघातानंतर संबंधित पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता दुसऱ्या रुग्णविहिकेची सोय केली. अपघातातील किरकोळ जखमी आणि प्रत्यारोपण करायचे यकृत घेऊन दुसरी रुग्णवाहिका रुबी हॉल क्लिनिकला पाठवली. त्यामुळे संबंधीत शस्त्रक्रिया वेळेत होणे शक्य झाले आहे.

Accident : काळजाचा तुकडा उराशी घट्ट धरावा, तसं एका जीवासाठी यकृत घेऊन जात होते, वाटेतच रुग्णवाहिकेचं टायर फुटलं...
सातारा-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचाच अपघाथ झाला होता.
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 4:06 PM

पुणे : संकटे आले की चोहिबाजूने येतात मात्र, नशीब बलवत्तर असले तर काय होऊ शकतो याचा प्रत्यय (Satara Pune Highway) सातारा-पुणे या महामार्गावर आला आहे. त्याचे झाले असे, (Liver Transplant) यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी, कोल्हापूरहून पुण्याकडे यकृत घेऊन येणाऱ्या (Ambulance) रुग्णवाहिकेला किकवी गावाच्या हद्दीत टायर फुटल्यानं अपघात झाला होता. अपघातानंतरही प्रसंगावधान दाखवत स्थानिक किकवी पोलीस स्टेशनंच्या कर्मचाऱ्यांनी, तातडीनं दुसऱ्या रुग्णवाहिकेसह घटना स्थळी धाव घेत, अपघातातील किरकोळ जखमींना मदत करून यकृत वेळेवर पुण्यामध्ये पोहचवलं.त्यामुळं संबंधित शस्त्रक्रिया वेळेत होणे शक्य झाले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे तर कौतुक होत आहेच पण नशी बलवत्तर असल्यावर काय होऊ शकते याचे उदाहरण देणारा हा प्रसंग चर्चेचा विषय ठरला आहे.

नेमकी घटना काय ?

यकृत प्रत्यरोपण शस्त्रक्रियेसाठी रुबी हॉल क्लिनिकची रुग्णवाहिका ही कोल्हापूरहून पुण्याकडे निघली होती. या ग्रीन कॉरिडॉरमध्ये यकृत घेऊन दोन डॉक्टरांसह पोलीस पायलट पुण्याकडे निघाले होते. मात्र, पुणे – सातारा महामार्गावरील किकवी येथे ग्रीन कॉरिडॉर येताच या रुग्णवाहिकेचे टायर फुटले. त्यामुळे रुग्णवाहिकेचा अपघात झाला. असे असतानाही वेळेचे गांभीर्य ओळखून किकवी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ आणि कर्मचाऱ्यांनी यांनी तातडीने स्थानिक रुग्णवाहिकेसह घटना स्थळी धाव घेतली. यकृत मार्गस्थ केले.

अखेर मोहिम फत्ते..!

रुग्णवाहिकेच्या अपघातानंतर संबंधित पोलिसांनी क्षणाचा विलंब न करता दुसऱ्या रुग्णविहिकेची सोय केली. अपघातातील किरकोळ जखमी आणि प्रत्यारोपण करायचे यकृत घेऊन दुसरी रुग्णवाहिका रुबी हॉल क्लिनिकला पाठवली. त्यामुळे संबंधीत शस्त्रक्रिया वेळेत होणे शक्य झाले आहे. अपघातानंतरही तत्परता दाखवत यकृत वेळेत पोहचविण्यात यश आल्यानं पोलीस कर्मचारी आणि रुग्णवाहिका चालक यांचं कौतुक होतंय.

कौतुकाचा वर्षाव

यकृत घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेलाच अपघात झाल्याने आता प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ही वेळेत होणार की नाही याबाबत शंका उपस्थित झाली होती. शिवाय याचे परिणामही धोक्याचे होते. पण रुग्णवाहिकेतील पोलीस पायलट यांनी तत्परता दाखवली आणि अवघ्या काही वेळेत दुसऱ्या रुग्णवाहिकेचे सोय केली. याकरिता स्थानिक किकवी पोलीस स्टेशनंच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीचेही सर्वत्र कौतुक होत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.