पालघरमधील एका गावतळ्यात पुरातन मूर्ती सापडल्या, 12 व्या शतकातील इतिहासाची पानं उघडणार

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील अनेक दुर्मिळ शिल्प सापडले आहेत.

पालघरमधील एका गावतळ्यात पुरातन मूर्ती सापडल्या, 12 व्या शतकातील इतिहासाची पानं उघडणार
Follow us
| Updated on: Dec 19, 2020 | 12:39 AM

पालघर : पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये ग्रामदान मंडळ जामसर या गावातील तळ्यात 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील अनेक दुर्मिळ शिल्प सापडले आहेत. त्यामुळे हे गाव सध्या चर्चेत आले आहे. गावातील तलावात सापडलेल्या मूर्तींमुळे 12 व्या शतकातील व मध्ययुगीन काळातील इतिहासाची पाने उघडणार आहेत. तसेच अनेक ऐतिहासिक अभ्यासकांना या शिल्पाचा अभ्यास करायला मिळणार आहे (Ancient idols found in a village of Javhar Palghar).

ग्रामस्थांना खोदकाम करताना या मूर्ती सापडल्या. आता या ठिकाणी सरकारच्या पुरातत्व खात्याने खोदकाम करावं, अशी मागणी होत आहे. जेणेकरुन काही दडलेल्या ऐतिहासिक वस्तू समोर येतील आणि मध्ययुगीन काळातील इतिहास सर्वाना कळेल. हे स्थळ पर्यटन स्थळं म्हणून घोषित करण्याचीही मागणी ग्रामदान मंडळ जामसर यांनी केली आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील ग्रामदान मंडळ जामसर या गावात ग्रामस्थांकडून गावतळ्याचं खोदकाम सुरु केलं होतं. हे करताना त्यांना अनेक दुर्मिळ शिल्पं सापडली. याची सध्या गावात जोरदार चर्चा आहे. गावातील तलावात सापडलेल्या या मूर्तींमुळे 12 व्या शतकातील आणि मध्ययुगीन काळातील इतिहासाची पानं उघडणार आहेत. तसेच अनेक ऐतिहासिक अभ्यासकांना या शिल्पाचा अभ्यास करायला मिळणार आहे.

या ठिकाणी अनेक दुर्मिळ शिल्पं सापडली आहेत. या शिल्पांमध्ये वीरगळे आहेत. वीरगळे म्हणजे लढाईत मरण पावलेल्या वीराचे प्राचीन स्मारकं. ही स्मारकं 12 व्या शतकात आणि मध्ययुगीन काळातील असल्याचं दिसत आहे, असं मत इतिहास अभ्यासक प्रणव पाटील यांनी व्यक्त केलं.

सापडलेल्या शिल्पांमध्ये एक दुर्मिळ शिल्प देखील आहे. 5 तोंडाची गाय, खाली एक वासरु आणि एकच शरीर असं दुर्मिळ शिल्पही या खोदकामात सापडलं आहे. आजपर्यंत अशी शिल्पं कुठंही सापडलेली दिसत नाही. या भागात खोदकाम केले तर अनेक दडलेल्या ऐतिहासिक वस्तू समोर येतील. यामुळे 12 व्या शतकातील  व मध्ययुगीन काळातील इतिहास सर्वाना कळेल. त्यावेळी असलेल्या मंदिरांची रचना करण्यात आलेले कोरीव कामं हे सर्वाना पाहता येईल, अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासाकडे केली.

हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे, अशी लेखी मागणी ग्रामदान मंडळ जामसर यांनी केली आहे. या गावात एकूण 3 तळी आहेत. अनेक दशकांपासून या तळ्यातील पाणी आटलेलं नाही, असं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे या तळ्यांखालीही काही पुरातन गोष्टी आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा :

पालघरच्या आदिवासी भागातही आधुनिक शेती, 86 ठिकाणी 26 हजार स्ट्रॉबेरी झाडांची लागवड

पालघरमध्ये मोगरा फुलावर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

पालघर, सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांचा रेल रोको, राजधानी एक तास रोखली

Ancient idols found in a village of Javhar Palghar

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.