Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक ! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहिन्याला 1500 रुपये देण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी उसळत असल्याने राज्य सरकारने ही जबाबदारी अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिलांवर सोपवली आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन अर्ज भरून घेण्याचं काम करत आहेत.

धक्कादायक ! लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अंगणवाडी सेविकेचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 3:09 PM

राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी तहसिल कार्यालयांवर तुफान गर्दी केली होती. त्यामुळे ही गर्दी कमी करण्यासाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या महिलांकडून घरच्या घरीच अर्ज भरून घेण्यासाठी अंगणसेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, सेतू सुविधा केंद्र आणि सामान्य महिलांवर ही जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार कामही सुरू झालं. पण हे काम सुरू असताना एक दुर्देवी घटना घडली आहे. लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून घेत असताना एका अंगणवाडी सेविकेचा मृत्यू झाला आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने तिचा मृत्यू झाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा सर्व्हे करून फॉर्म भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांवर दिलेली आहे. त्यामुळे गावोगावच्या अंगणवाडी सेविका गावात घरोघरी फिरून नारी दूत या ॲपवरून फॉर्म भरीत आहेत. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील देगाव मधील अंगणवाडी क्रमांक 1 च्या सेविका फॉर्म भरत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटक आल्याने त्या खुर्चीत कोसळल्या. यावेळी मदतनीस किचनमध्ये भांडी स्वच्छ करत होत्या. जोराचा आवाज झाला म्हणून घाबरून त्या आत आल्या असता अंगणवाडी सेविका सुरेखा आतकरे या खुर्चीत निपचित पडल्याच त्यांना दिसले.

गावावर शोककळा

सुरेखा आतकरे यांना खुर्चीत निपचित पडलेलं पाहून अंगणवाडी मदतीसने तात्काळ त्यांना मोहोळ येथील सरकारी दवाखान्यात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी आतकरे यांना तपासून मृत घोषित केलं. आतकरे यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करण्यात आलं आहे. त्यानंतर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतकरे यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सुरेखा आतकरे यांच्यावर देगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व्हर डाऊनच्या तक्रारी सुरूच

दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना अजूनही अडचणी येत आहेत. ज्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस येत नाहीत, त्या ठिकाणी महिला सेतू केंद्रावर गर्दी करत आहेत. त्यामुळे अचानक गर्दी झाल्याने आणि काम वाढल्याने सर्व्हर डाऊन होण्याच्या घटना घडताना दिसत आहेत. अमरावतीतही हा प्रकार पाहायला मिळाला. अमरावतीच्या भातुकली येथील सेतू केंद्रावर महिलांनी प्रचंड गर्दी केली. त्यावेळी केंद्रावर सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे भर पावसात महिलांना रांगेतच तिष्ठत उभं राहावं लागलं आहे. आपली मोलमजुरी सोडून महिला रोज सेतू केंद्रावर येत आहेत. पण काही ना काही तांत्रिक आडचणी निर्माण होत असल्याने महिलांना रोज पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे मजुरी बुडत असल्याने महिला वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे.

न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी
विधानभवनाच्या गॅलरीत उद्धव ठाकरेंची फडणवीसांना मिश्किल टोलेबाजी.
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले...
कराडकडून १५ लाखांची खंडणी? आरोपांवर शिवराज बांगर स्पष्टच म्हणाले....