Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anil Bonde | 'Nitin Raut वरूड-मोर्शीला आले तर लोक त्यांचं चपलांचा हार टाकून स्वागत करतील'

Anil Bonde | ‘Nitin Raut वरूड-मोर्शीला आले तर लोक त्यांचं चपलांचा हार टाकून स्वागत करतील’

| Updated on: Mar 13, 2022 | 3:40 PM

ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) जर अमरावतीच्या (Amravati) वरूड मोर्शीला आले तर लोक त्यांचे चपलांचा हार टाकून स्वागत करतील, असे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या डॉ. अनिल बोंडे यांनी केले.

आपल्या वादग्रस्त वक्तव्याने पुन्हा एकदा भाजपाचे नेते डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) चर्चेत आले आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) जर अमरावतीच्या (Amravati) वरूड मोर्शीला आले तर लोक त्यांचे चपलांचा हार टाकून स्वागत करतील, असे वक्तव्य माजी मंत्री असलेल्या डॉ. अनिल बोंडे यांनी केले. नागपूर येथे मविआ सरकार विरोधात निघालेल्या निषेध मोर्चामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे. संत्रा आता येत आहे आणि अशात त्यांनी डीपी बंद केल्या, असा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अशा नेत्यांनी मोकळे येवून दाखवावे, त्यांना चपलाने बडवले जाईल, कारण शेतकरी संतप्त झाला आहे, विद्यार्थी संतप्त आहे, गोरगरीब जनता खवळली आहे, असे वक्तव्य करत त्यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविषयी केले आहे.