बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी… आठवलेंना गृहमंत्र्यांच्या हटके शुभेच्छा

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रामदास आठवलेच्या स्टाईलमध्ये कविता लिहून आरपीआय अध्यक्षांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बाहेर पडलीय थंडी, घालून बसा बंडी... आठवलेंना गृहमंत्र्यांच्या हटके शुभेच्छा
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 6:49 PM

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकल पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांचा आज 61 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांना अनेक राजकीय नेत्यांनी आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे सकाळपासून त्यांच्यावर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. रामदास आठवले हे एक उत्तम कवी आहेत, त्यांच्या कविता नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे अनेकांनी कवितेच्या माध्यमातून आठवले यांना शुभेच्छा दिल्या आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांनीदेखील रामदास आठवले स्टाईल कविता लिहून आठवले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Anil Deshmukh birthday wishes to Ramdas Athavale in poetic way)

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही वेळापूर्वी फेसबुकवर एक कविता शेअर करत आठवले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. (अनिल देशमुख यांनी शेअर केलेली कविता)

बाहेर पडलीय थंडी घालून बसा बंडी बाहेर फिरू नका रात्री, कारण आहे संचारबंदी पण आज दिवस आहे जल्लोषाचा कारण वाढदिवस आहे भारी कवीचा युतीसंगे बांधला त्यांनी विकासाचा चंग आठवले साहेब म्हणजे राजकारणातील कवी दबंग आठवले साहेब आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

सांगली जिल्ह्यातील अगलगाव या गावातील एका गरीब कुटुंबात 25 डिसेंबर 1959 रोजी रामदास आठवले यांचा जन्म झाला. आठवलेंच्या लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले. त्यांच्या आईने अंत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करुन रामदास आठवले यांना वाढवले. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीच्या तासगाव तालुक्यातील ढालेवाडी येथे झाले. पुढे त्यांनी मुंबईत शिक्षण घेतले. 1972 मध्ये दलित पॅंथरची स्थापना झाली तेव्हा रामदास आठवले पॅंथरमध्ये सक्रिय झाले. पॅंथरमुळेच त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. त्यानंतर ते सक्रीय राजकारणात आले. आठवले यांनी सुरुवातीला महाराष्ट्राचे समाजकल्याण आणि परिवहन मंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर मुंबई आणि पंढरपूर या लोकसभा मतदार संघांतून ते खासदार झाले. सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत, तसेच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्रीदेखील आहे.

हेही वाचा

‘कोरोना को मत डरोना, नियम पाळा, कोरोनाला जाळा’, रामदास आठवलेंची नवी कविता

उद्धव ठाकरे म्हणतात 25 वर्षे सत्तेत राहू, मग आम्ही काय करायचं? – रामदास आठवले

मग मी मंत्रालयात कसा येऊ? रामदास आठवलेंचा राज्य सरकारला सवाल!

(Anil Deshmukh birthday wishes to Ramdas Athavale in poetic way)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.