VIDEO: अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला ही चूक होती, राऊतांची पहिल्यांदाच कबुली
अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होत, अशी कबुलीही शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज दिली.
नागपूर: नवाब मलीक यांचा राजीनामा घेणार नाही. अनिल देशमुख (anil deshmukh) यांचा राजीनामा घेणं ही चूक होती. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय घाई घाईत झाला. थोडं संयमाने घ्यायला हवं होत, अशी कबुलीही शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी आज दिली. अनिल देशमुख यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं. अनिल देशमुखांच्या घरावर सीबीआयने (cbi) 22, ईडीने 50च्यावर, आयकर विभागाने 40 धाडी घातल्या. एका माणसावर इतक्या धाडी घालून कोणता विक्रम प्रस्थापित केला? असा सवालही राऊत यांनी केला. तसेच देशमुख यांचा राजीनामा घेण्यासाठी शरद पवार दबावात होते का? या प्रश्नाला मला असं वाटत नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. तसेच संपूर्ण देशात सूडाचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र त्याला अपवाद नाही. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सूडाचं राजकारण सुरू आहे. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज दिल्लीच्या तख्तापुढे झुकले नाहीत. महाराष्ट्रही दिल्लीपुढे वाकणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
संजय राऊत हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना देशमुख यांचा राजीनामा घेण्याची चूक झाल्याचं स्पष्ट केलं. शिवसेनेला भाजपकडून जनाब सेना संबोधून हिणवलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. राजकीय विचारधारेचा सवाल केवळ शिवसेनेला का विचारता. हा भाजपला सवाल केला पाहिजे,. काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्तीसोबत युती केली तेव्हा तुमची विचारधारा कुठे होती? असा सवाल राऊत यांनी केला.
संघाला जनाब संघ म्हणणार का?
हिंदु-मुसलमान भाजपला आणि आम्हालाही मतदान करतात. ज्या नागपूरमध्ये मी बसलोय त्या नागपुरात संघाचं मुख्यालय आहे. हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी संघ एक प्रमुख संघटना आहे. आम्ही त्यांच्याकडे आदराने पाहतो. सरसंघचालक मोहन भागवत यांची गेल्या काही काळातील मुस्लिम समाजाविषयीची वक्तव्य पाहिली तर संघालाही जनाब सेना म्हणणार का? मोहन भागवत यांनी गेल्या काही वर्षात अनेकदा सांगितलं मुस्लिम आणि हिंदूचा डीएनए सारखा असल्याचं विधान केलं आहे. म्हणून ते जनाब संघाचे प्रमुख झाले का?, असा सवाल त्यांनी केला. आम्हाला जनाब सेना म्हणता मग भाजपने अल्पसंख्याक सेल कुणासाठी निर्माण केला? मग आम्ही तुम्हाला मियाँ खान मौलाना म्हणायचं का?, असा सवालही त्यांनी केला.
तुम्ही रोजच फाळणी करताय
संघाने मुस्लिमांसाठी राष्ट्रीय मंच काढला. म्हणून भागवत जनाब सेनेचे प्रमुख झाले का? भागवतांनी सांगितलं देशातील नेते राजकारणी या देशात मुस्लिम राहूच नये अशी भूमिका मांडत असतील तर ते हिंदू नाहीत. त्यांना हिंदू म्हणता येणार नाही असं म्हणणाऱ्या भागवतांना जनाब संघ अशी उपमा देणार का? तर भाजपला पीजेपी म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी म्हणाल का? नाही. मुसलमान या देशाचा हिस्सा आहे. हजारो मुसलमान या देशात राहतात. भाजपने नेमलेले अनेक राज्यपाल मुसलमान आहेत. केरळचे राज्यपाल मुसलमान आहेत. सिंकदर बख्त सारखे भाजपचे नेते होते. आमच्याकडेही आहेत. या देशात जातीय, धार्मिक द्वेषाची फाळणी करून राजकारण करणार असाल तर जीनाने एक फाळणी केली, तुम्ही रोज फाळणी करताय आणि याची केव्हा तरी देशाला किंमत चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
संबंधित बातम्या:
Shivsena-BJP भविष्यात एकत्रं येणार नाही, संजय राऊतांचं मोठं विधान; कारणही सांगितलं
Video | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जनाब सेना म्हणणार का? Shiv Sena नेते संजय राऊत यांचा सवाल
Video | केंद्रीय तपास यंत्रणा खुळखुळा झालाय, Sanjay Raut यांचा भाजपवर निशाणा