Anil Parab : अनिल परबांभोवती ईडीचे फेरा आवळला, मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रं ताब्यात

ईडीने साई रिसॉर्टसंबंधातील कागदपत्रं ही मुरूड ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतली आहेत. तर दुसरीकडे ही कारवाई मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमच्यावर दबाव टाकण्यासाठी होत आहे, असा आरोप अनिल परब यांच्याकडून करण्यात आला आहे.

Anil Parab : अनिल परबांभोवती ईडीचे फेरा आवळला, मुरुड ग्रामपंचायतीकडून साई रिसॉर्टची कागदपत्रं ताब्यात
अनिल परब, साई रिसॉर्टImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 28, 2022 | 4:30 PM

रत्नागिरी : मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या मागे आता ईडीचा (ED) फेरा लागाला आहे. दोन दिवसांपूर्वीच परबांच्या मालमत्ता, कार्यलय आणि घरावर ईडीकडून दिवसभर धाडसत्र करण्यात आलं. यावेळी परबांची चौकशीही करण्यात आली, एवढेच नाही तर परबांच्या निकटवर्तीयांच्या घरीही धाडी टाकून त्यांचीही चौकशी ईडीने कली. ईडी फक्त मुंबईतच नाही. तर ज्या साई रिसॉर्टवरून (Sai Resort) अनिल परब यांच्यावर किरीट सोमय्या वारंवार आरोप करत होते. त्या रिसॉर्टवरही ईडीकडून धाड टाकण्यात आली. या धाडसत्रानंतर आज अनिल परबांच्या अडचणीत आणकी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण ईडीने साई रिसॉर्टसंबंधातील कागदपत्रं ही मुरूड ग्रामपंचायतीकडून ताब्यात घेतली आहेत. तर दुसरीकडे ही कारवाई मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन आमच्यावर दबाव टाकण्यासाठी होत आहे, असा आरोप अनिल परब यांच्याकडून करण्यात आला आहे.

कोणती कागदपत्रं ईडीच्या हाती?

दोन दिवसांपूर्वी ईडीने धाडसत्र राबवल्यानंतर आज ईडीचे पथक दापोलीत दुसऱ्यांदा पोहोचले आहे. ईडीच्या पथकाने मुरुड ग्रामपंचायतीमध्ये जाऊन घेतल्या कागदोपत्री अधिकृत नक्कला आणि इतर काही महत्वाची कागदपत्रं ही ताब्यात घेतली आहेत. रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित मालममत्तांची चौकशी आता ईडीकडून कसून सुरू आहे. त्यामुळे . गुरुवारी ईडीचे पथक मुरुड येथे दाखल झाले, त्यावेळी त्यांनी जाऊन पाहणी केली. आता या रिसॉर्टची कागदपत्रेही ईडीच्या तब्यात आल्याने आता अनिल परबांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रिसॉर्टवरून राजकीय आरोप प्रत्यारोप

गेल्या अनेक दिवसांपासून या रिसॉर्टवरून राजकीय वादंग सुरू आहे. अनिल परबांचे हे रिसॉर्ट आहे, आणि ते अनाधिकृत आहे. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडले पाहिजे अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वारंवार केली आहे. तर या रिसॉर्टची पाहणी करण्यासाठीही किरीट सोमय्या कोकणातही पोहोचले होते. त्यावेळी मोठा पॉलिटिकल राडा झाला होता. त्यानंतर या रिसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही. किरीट सोमय्या हे वारंवार आरोप करुन मला बदनाम करत आहेत, असा आरोप अनिल परबांकडून करण्यात आला होता. तसेच सोमय्या यांनी माफी मागावी अन्यथा आपण कोर्टात आब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही परब सांगत होते. त्यामुळे हा वाद आता पुन्हा चांगलाच वाढला आहे. आता ईडीच्या कारवाईत पुढे काय धागेदोरे हाती लागतात यावरून राज्याच्या राजकारणात पुढची पाऊलं ठरणार आहेत.

हे सुद्धा वाचा
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.