वसूबारसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची विशेष मोहीम, लंपी आजारच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय…

देशात काही महिन्यांपूर्वी जनावरांच्या लंपी या आजाराने डोकं वर काढले होते, त्यानुसार राज्यासह नाशिक जिल्ह्यात देखील काही जनावरांना लंपी आजाराची लागण झाली होती.

वसूबारसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेची विशेष मोहीम, लंपी आजारच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा निर्णय...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Oct 19, 2022 | 8:04 PM

नाशिक : नाशिक जिल्हा परिषदेने (Nashik ZP) शेतकऱ्यांसाठी एक विशेष मोहीम हाती घेतलीय. लंपी आजारच्या (Lampi) पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेकडून वसुबारसच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. नाशिक जिल्हयामध्ये सर्वत्र जनजागृतीपार कार्यक्रम आणि लसीकरण मोहीम सुरू असतांना आणखी एक मोहीम हाती घेण्यात आली आहे. वसुबारसच्या निमित्ताने जिल्ह्यातील ग्रामपंचायत वसुबारस सणाच्या दिवशी एकाचवेळी गोठे, जनावरांचा वावर असलेला परिसर हा स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यात येणार आहे. त्यासाठी पशू संवर्धन विभागाने पुढाकार घेतला असून ग्रामपंचयातीमध्ये तश्या सूचना केल्या आहे. जनावरांमधील लंपी हा आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने व बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्काने होतो. त्यामुळे वसुबारसच्या निमित्ताने जिल्हा परिषदेने हाती घेतलेली महत्वाची ठरणार आहे.

संपूर्ण देशात काही महिन्यांपूर्वी लंपी या आजाराने डोकं वर काढले होते, त्यानुसार राज्यासह नाशिक जिल्ह्यात देखील काही जनावरांना लंपी आजाराची लागण झाली होती.

या आजाराच्या नियंत्रणासाठी गोठ्यांची साफसफाई, गोचिड, डास, बाह्य कीटकांचे निर्मूलन करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्यावतीने देण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

नाशिक जिल्ह्यातील एकूण आठ लाख ९५ हजार पन्नास गोवर्गीय जनावरे असून यापैकी आठ लाख ४० हजार तीनशे ९३ जनावरांचे (९३.८८%) लसीकरण पूर्ण झाले आहे.

जनावरांमधील लंपी हा आजार डास, कीटक, गोमाश्या, गोचिड यांच्या चाव्याने आणि बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्काने होतो, त्यामुळे वसूबारसच्या निमित्ताने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे.

कशाने करावी स्वच्छता- गोठे व जनावरांचा वावर असलेल्या ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी 1) Liq. Amitraz for dip,spray 12.5% dip concentrate 2) Liq. Deltamethrin EC १२.५%, 3)Liq. Cypermethrin १०% प्रमाण – जनावरांच्या अंगावर पाण्यातून फवारणीसाठी मात्रा २ मि.ली. / प्रति लिटर रिकाम्या गोठ्यात पाण्यातून फवारण्यासाठी ४मि.ली. / प्रति लिटर या प्रमाणात वापर करण्यात यावा अशा सूचना ग्रामपंचायतींना करण्यात आल्या आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.