‘दाते पंचांग बघून आत्मसमर्पण…’ कराडच्या शरणागतीनंतर दमानियांचा हल्लाबोल

वाल्मिकी कराड आज सीआयडीला शरण आला आहे, त्यानंतर आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावर प्रतिक्रिया देताना जोरदार टोला लगावला आहे

'दाते पंचांग बघून आत्मसमर्पण...' कराडच्या शरणागतीनंतर दमानियांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 5:00 PM

वाल्मिकी कराड अखेर शरण आला आहे, त्याने पुण्यात सीआयडीसमोर शरणागती पत्कारली आहे. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात त्याच्यावर आरोप करण्यात येत होते. हत्येच्या घटनेनंतर 22 दिवसांनी वाल्मिकी कराड याने शरणागती पत्कारली आहे. वाल्मिकी कराड शरण आल्यानंतर आता राजकीय वर्तुळातून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील या प्रकारणावर प्रतिक्रिया देताना जोरदार हल्लाबोल केला आहे. दाते पंचांग बघून आज कराडने आत्मसमर्पणे केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाल्या दमानिया? 

‘दाते पंचांग बघून आज आत्मसमर्पण केलं? खरतर, ही पोलिसांसाठी नामुष्कीची बाब आहे. १७ तारखेला शेवटचा कॉल ट्रेस पुण्यात होता आणि सरेंडर पुण्यातच झाले ह्याचा अर्थ इतके दिवस ते पुण्यातच होते. पुण्यात राहून पोलिसांना न सापडणे बुद्धीला पटण्यासारखं आहे का ? पोलिस इंटेलिजेंस काय करत होतं? हे राजकारणी त्यांना संरक्षण देत होते ह्यात शंकाच नाही.’ असं ट्विट दमानिया यांनी केलं आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेत जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होणार, आम्ही कोणालाही सोडणार नाही. हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आलं आहे. दोषींवर कारवाई होणार,  मात्र ज्यांना -ज्यांना यामध्ये राजकारण वाटत असेल त्यांना ते लखलाभ, माझं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाशी फोनवर बोलणं झालं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाल्मिकी कराडवर संतोष देशमुख प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोप करण्यात येत होते. मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर त्याने आज पुण्यात शरणागती पत्कारली, तो सीआयडीला शरण आला आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.