शरद पवार यांच्या राजीनाम्याची कुणकुण कुणाला होती? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी केला मोठा गौप्यस्फोट
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा नेते अंकुश काकडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामध्ये शरद पवारांच्या निर्णयाची कुटुंबात माहिती असण्याची पुसटशी शक्यता आहे, मात्र याबाबत निश्चित माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा मंगळवारी मुंबईत केली होती. त्यानंतर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना हा निर्णय मागे घ्यावा यासाठी रेटा लावून धरला आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी शरद पवार यांच्याबाबत भाष्य करत असताना शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष राहावे अशी मागणी केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली असून शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी यावर भाष्य करत शरद पवार हेच अध्यक्ष राहावे अशी मागणी करत असतांना गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते तथा नेते अंकुश काकडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यामध्ये शरद पवारांच्या निर्णयाची कुटुंबात माहिती असण्याची पुसटशी शक्यता आहे, मात्र याबाबत निश्चित माहिती नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
अशी प्रतिक्रिया देत असतांना शरद पवारांनी काल समिती नेमली, मात्र समितीत सुप्रिया सुळे यांच नावं नाही, मात्र सर्वार्थाने सुप्रिया सुळे यांच नावं पुढे येऊ शकतं अशी शक्यता अंकुश काकडे यांनी वर्तवली आहे. त्यामुळे हा एक मोठा गौप्यस्फोट मानला जात आहे.
शरद पवार यांनीच पक्षाचे अध्यक्ष राहावे यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन दबावतंत्राचा वापर करीत आहे. वरिष्ठ नेते मनधरणी करीत आहे. त्यामध्ये शरद पवार यांनी भाकरी फिरण्याची गरज व्यक्त केली होती. त्यामध्ये नव्या लोकांना संधी देण्याची घोषणा केली होती.
शरद पवार यांनी मात्र स्वतःच राजीनामा देण्याची घोषणा केल्याने यावरून तर्क वितर्क लावले जात आहे. त्यामध्ये अजित पवार यांनी घेतलेली भूमिका पाहता अजित पवार यांनी वेगळं मत मांडलं. त्यात त्यांनी सुप्रिया सुळे यांना ही बोलू दिले नाही.
एकूणच ही संपूर्ण परिस्थिती पाहता शरद पवार यांच्या कुटुंबात याबाबत काही चर्चा झाली आहे का? आधीच याबाबत ठरलं होतं. पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याबाबत काही चर्चा झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यातच अंकुश काकडे यांनी केलेले विधान पाहता आगामी काळात काय घडामोडी घडतात याकडे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.