पदभार स्वीकारताच नव्या पोलीस आयुक्तांचा इशारा, गुन्हेगारांवर कसा ठेवणार वचक ? जाणून घ्या
नुकताच मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला असून येत्या काळात गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी खास उपाययोजना करण्याचे सांगितले आहेत.
नाशिक : सायबर गुन्हेगारी आणि फसवणूकीच्या घटनांकडे विशेष लक्ष देऊन नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबवू अशी पहिली प्रतिक्रिया नाशिकचे नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना दिलीय. शुक्रवारी सायंकाळी अंकुश शिंदे यांनी मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून नाशिक पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असून शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन यावेळी त्यांचे नव्या पोलीस आयुक्तांचे स्वागत केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरातील गुन्हेगारी वाढत चालली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला नाही अशी चर्चाही नाशिकच्या जनमानसात निर्माण झाली आहे. त्यामुळे नव्या पोलीस आयुक्तांच्या नियुक्तीने नाशिक शहरातील गुन्हेगारी मोडीत काढली जाईल अशी आशा पल्लवित झाल्या आहे.
नुकत्याच राज्यातील बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अंकुश शिंदे यांच्याकडे नाशिक शहर पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नुकताच मावळते पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्याकडून नवनियुक्त पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला असून येत्या काळात गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी खास उपाययोजना करण्याचे सांगितले आहेत.
नाशिक शहरात सोनसाखळी, सायबर गुन्हेगारी, खून, दरोडे अशा घटना घडत असून त्या रोखण्याचं आव्हान नाशिक शहराचे नवे पोलीस आयुक्त यांच्याकडे असणार आहे.
नाशिक शहर हे कुंभनगरी आहे, त्यातच पर्यंटनासाठी दररोज हजारो पर्यटक येत असतात, त्यामुळे सुरक्षेचा दृष्टीने नव्या आयुक्तांनी विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
नाशिक शहरात लष्करी संस्था आहे, तेथेही मागील काही दिवसांपूर्वी ड्रोनद्वारे टेहळणी करण्यात आल्याचे समोर आले होते, त्याचा शोध अद्यापही लागलेला नसून सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी घ्यावी लागणार आहे.
माध्यमांशी बोलत असतांना नवनियुक्त पोलीस आयुक्त यांनी नुकताच पदभार स्वीकारला असला तरी गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यासाठी उपाययोजना करू असा इशारा दिला आहे.