अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं (Anna Hazare Letter CM Uddhav Thackeray) आहे.
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ग्रामविकास विभागाने घटनाबाह्य परिपत्रक काढून जनतेची दिशाभूल केली, असा आरोप अण्णा हजारे यांनी पत्रात केला आहे. जर हा निर्णय झाला तर आंदोलन करु, अशा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे. (Anna Hazare Letter CM Uddhav Thackeray Controller on Gram Panchayats)
“ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमताना पालकमंत्र्यांचा सल्ला घ्या असे परिपत्रक ग्रामविकास विभागाने घटनेची आणि कायद्याची पायमल्ली करुन काढून जनतेची दिशाभूल केली आहे” असेही अण्णांनी या पत्रात म्हटलं आहे. हा निर्णय घेणाऱ्या मंत्र्याचा गृहपाठ कच्चा राहिला आहे. त्यामुळे त्यांना कायदा, घटना यांचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचा सल्ला अण्णा हजारे यांनी दिला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
त्याचबरोबर राज्यात पक्षाची, पक्षाने, पक्ष सहभागातून चालविलेली शाही येऊन लोकशाही पायदळी तुडविली जाणार असं मत अण्णांनी व्यक्त केलं आहे. तर घटनेत पक्ष पार्टीचा उल्लेख कुठेही नसून ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचे अधिकार पालकमंत्र्यांना देऊन पक्ष पार्टीच्या माणसांचा हस्तक्षेप होणे बेकायदेशीर आहे हे नाकारता येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
राज्यात एप्रिल, मे आणि जूनमध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाविरोधात अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली होती.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
राज्यातील 19 जिल्ह्यातील एक हजार 566 ग्रामपंचायतींची मुदत एप्रिल ते जून 2020 दरम्यान समाप्त झाली आहे. तर 12 हजार 668 ग्रामपंचायतींची मुदत जुलै ते डिसेंबर 2020 च्या दरम्यान समाप्त होत आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर संबंधित गावातील व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वेळा पत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेणे शक्य होत नाही. (Anna Hazare Letter CM Uddhav Thackeray Controller on Gram Panchayats)
संबंधित बातम्या :
ग्रामपंचायतींवर प्रशासक बसवण्याचा अध्यादेश मागे घ्या, सुधीर मुनगंटीवारांची सरकारकडे मागणी